‘विकेंड लॉकडाऊन’ महाड मध्ये कडकडीत बंद

दोन दिवसांच्या विकेंड लॉकडाऊन लागू करताना पोलिस तसेच स्थानिक प्रशासन सज्ज होते, नियमांची अंमल बजावणी न करणाऱ्या विरोधात दंडात्मक कारवाई त्याच बरोबर नियम मोडणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल होणार यामुळे नागरिक, व्यापारी या सर्वांनी त्याच काटेकोर पणे पालन केले.

    महाड : राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आलाय. कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्यात शुक्रवारी रात्रीपासून विकेंड लॉकडाऊन लागू केला. शुक्रवार रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ वाजेपर्यंत दोन दिवस हा लॉकडाऊन असणार आहे.

    वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे राज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शुक्रवार रात्रीपासूनच हा लॉकडाऊन सुरु झालाय. या काळात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या व्यक्तींनाच प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्याप्रमाणे महाड औद्योगिक वसाहत वगळण्यात आली होती यामुळे सकाळ दुपार कारखान्याच्या बसेस कामगारांना ने आण करण्यासाठी शहरातील शिवाजी चौक दरम्यान थोडी रेलचेल दिसून आली या व्यतिरिक्त दिवसभर नागरिकांनी घरातच बसणे पसंत केले होते.

    दोन दिवसांच्या विकेंड लॉकडाऊन लागू करताना पोलिस तसेच स्थानिक प्रशासन सज्ज होते, नियमांची अंमल बजावणी न करणाऱ्या विरोधात दंडात्मक कारवाई त्याच बरोबर नियम मोडणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल होणार यामुळे नागरिक, व्यापारी या सर्वांनी त्याच काटेकोर पणे पालन केले. शहरांतील मुख्य बाजार पेठ, शाळा, कॉलेज मंदिर, धार्मिक स्थळे, खाजगी क्लासेस, मिनि डोअर, आटो रिक्षा, खासगी वहाने, भाजी दुकांनासह सर्व कडकडीत बंद पाळण्यात आला होता. स्वतः हून नागरिकांनी बंद पाळल्यामुळे पोलिसांना कुठेही बळाचा वापर करावा लागला नाही.

    गेल्या पंधरा दिवसांत म्हणजे होळी सण, लग्न समारंभ, बाजारात वाढणारी रोजची तोबा गर्दी यामुळे महाड शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. मृत्यूही यामुळे होवू लागलेत त्यामुळे मागील वर्षाप्रमाणे आता पुन्ह कोरोना जोर धरू लागलाय याची जाणीव नागरिक व्यापाऱ्यांना झाली आहे. आजच्या पहिल्या दिवशी शंभर टक्के आणि कडकडीत बंद पाळला गेला.