mhasala jetty

महाड : रायगड(raigad ) व रत्नागिरी(ratnagiri) या दोन जिल्हयांना जोडणाऱ्या सावित्री नदीवरील आंबेत पुलाच्या(ambet bridge) दुरुस्तीचे काम गेली दीड वर्षे सुरु आहे. पुलावरुन सुरु असलेली वाहतूक पूर्ण बंद करुन राहिलेले काम जलद गतीने करण्यासाठी दळणवळणाच्या पर्यायी व्यवस्थेसाठी म्हाप्रळ बंदर येथे जंगल जेट्टीचे भूमीपूजन रविवारी रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

महाड : रायगड(raigad ) व रत्नागिरी(ratnagiri) या दोन जिल्हयांना जोडणाऱ्या सावित्री नदीवरील आंबेत पुलाच्या(ambet bridge) दुरुस्तीचे काम गेली दीड वर्षे सुरु आहे. पुलावरुन सुरु असलेली वाहतूक पूर्ण बंद करुन राहिलेले काम जलद गतीने करण्यासाठी दळणवळणाच्या पर्यायी व्यवस्थेसाठी म्हाप्रळ बंदर येथे जंगल जेट्टीचे भूमीपूजन रविवारी रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.(substitute jetty available for ambet bridge) त्यावेळी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, प्रदुषण विरहित कारखाने आणून येथील विकास साधण्याचा प्रयत्न असून येत्या काही वर्षात ते पूर्णत्वाकडे जाईल .

मुंबई-गोवा हायवेवरुन थेट लोणेरे, गोरेगाव अथवा टोळ मार्गे कोकणातील मंडणगड, दापोली, बाणकोट तसेच अगदी खेडकडे जाणेसाठी आंबेत मार्गे आंबेत पुलाने रायगड व रत्नागिरी या दोन जिल्हयांना जोडण्याचे काम केले आहे. मात्र सावित्री पूल दुर्घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रतील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आल्यानंतर आंबेत पूल नादुरुस्त असल्यामुळे गेली दीड वर्षे या पुलाचे दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्यामुळे या पुलावरुन अवजड वाहनांना वाहतूकीसाठी बंदी होती. मात्र छोट्या वाहनांसाठी अडीच मीटर उंचीची कमानी टाकून वाहतूक सुरु ठेवण्यात आली होती. यामुळे आतापर्यंत पूर्ण काम होऊ शकलेले नाही. पूर्ण वाहतूक बंद केल्याशिवाय या पूलाचे काम होणार नसल्याचे निष्पन्न झाल्यावर मेरिटाइम बोर्डाकडे सुचविल्यानुसार जंगल जेट्टीला मान्यता मिळून तीचे भूमीपूजन जिल्हयाचे खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते पार पडले.

कोकणात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी माझे प्रयत्न सुरु असून त्यासाठी सागरी महामार्गासाठी यावेळच्या अर्थसंकल्पात मान्यता मिळाली असून साडे चार हजार कोटी रुपयांच्या कामाला मान्यता मिळून त्याची निविदा व प्रत्यक्षात कामाला सुरुवात भविष्यात येत्या दोन-तीन महिन्यांत होईल, असे देखील तटकरे यांनी यावेळी सांगितले. तर मंडणगड, दापोली या परिसरात प्रदुषण न करणारे कारखाने आणण्याचादेखील मानस आहे. तसेच पर्यटनाला चालना मिळावी आणि येथील महापुरुषांची स्मारके उभारुन इतिहास, भूगोल व भविष्याचा वेध घेणारी नवीन पिढी यासर्व पर्यटनाच्या माध्यमातून येवू शकेल असा पर्यटन विकास भविष्यात साधला जाईल.

त्याचबरोबर हर्णे, श्रीवर्धनमधील जिवना, मुरुड तालुक्यातील आगारदांडा या जेटीसाठी देखील साडे पाचशे कोटी रुपयांच्या प्रस्तावाला येत्या महिन्याभरात मान्यता मिळणार आहे. त्यामुळे येथील सर्वार्थाने विकास साधण्याचा माझा प्रयत्न असून भविष्यात आपल्या सगळयांना हवाहवासा येथील विकासात्मक परिसर आपल्याला पाहायला मिळेल असे ते यावेळी म्हणाले.