एन.एस.यु.आय.च्या मागणीला यश…! शिक्षकांनाही ५० लाखाचे विमा संरक्षण देण्याची केली होती मागणी

पोलादपूर- कोविड-१९ (कोरोना)च्या लढ्यात प्रशासनाने खाजगी शाळेचे शिक्षक,जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक यांना सर्वेक्षण करणे,शाळेत विलिगीकरण केलेल्या व्यक्तींची व्यवस्था पाहणे,नोडल अधिकारी म्हणून

  पोलादपूर- कोविड-१९ (कोरोना)च्या लढ्यात प्रशासनाने खाजगी शाळेचे शिक्षक,जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक यांना सर्वेक्षण करणे,शाळेत विलिगीकरण केलेल्या व्यक्तींची व्यवस्था पाहणे,नोडल अधिकारी म्हणून काम करणे,गावात आलेल्या लोकांच्या नोंदी करणे,चेक पोस्ट वर ड्यूटी करणे यासारखी जोखमीची कामे शिक्षकांना करावी लागतात.पण त्यांना शासनाने  पोलीस, वैद्यकीय सेवा, व इतर कर्मचारी यांच्या सारखे विमा कवच दिले नव्हते.

त्याचे गांभीर्य ओळखुन शिक्षकांना ५० लाखाचे विमा संरक्षण द्यावे ही मागणी माजी आमदार व रायगड जिल्हा  काँग्रेसचे अध्यक्ष श्री.माणिक जगताप साहेब व महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष अमिर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश एन.एस.यु.आय चे सरचिटणीस शिवराज पार्टे यांनी महाराष्ट्र शासनाला केली होती. शासनाने कोविड संक्रमणाच्या काळात  सेवा देणारे कर्मचारी यांना  विमा संरक्षण देणार असल्याचा आध्यादेश शासनाच्या वतीने काढण्यात आला. एन.एस.यु.आय.ची.मागणी मान्य केली त्याबद्दल त्यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहेत.या बद्दल शिक्षक वर्गाने सुध्दा समाधान व्यक्त केले आहे.