pali farmer strike

सुधागड(sudhagad) तालुक्यातील भेरव येथील शेतकरी(farmer) चिंतामण पवार यांनी बिल्डर पागुर देसाई यांच्या विरोधात १९ ऑक्टोबरपासून पाली तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण(hunger strike) सुरू केले आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे.

पाली: सुधागड(sudhagad) तालुक्यातील भेरव येथील शेतकरी(farmer) चिंतामण पवार यांनी बिल्डर पागुर देसाई यांच्या विरोधात १९ ऑक्टोबरपासून पाली तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण(hunger strike) सुरू केले आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशीदेखील प्रशासनाकडून मागण्यांसंदर्भात कोणत्याही हालचाली होतांना दिसत नाहीत. त्यामुळे उपोषणकर्ते पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

बिल्डर पागुर देसाई याने शेतकरी पवार यांची तलाठी सजा आवंढे येथील स्वतः च्या मालकीच्या सर्वे नं १०४ ची जागा हडप करून  शासनाची दिशाभूल करण्याकरिता सन २०१० रोजी खोटे बनावट प्रतिज्ञापत्र तयार केले ते प्रतिज्ञापत्र बिल्डर पागुर देसाई यांनी स्वतःच्या नावाने घेतले असून शेतकरी चिंतामण पवार यांच्या नावाने बनविले गेले आहे. तसेच प्रतिज्ञापत्रात शेतकरी व त्यांच्या बहिणींच्या खोट्या सह्या व राहण्याचे ठिकाण यात तफावत असून ते प्रतिज्ञापत्र मुदत बाह्य असल्याचे दिसून येत आहे असा आरोप चिंतामण पवार यांनी केला आहे.

अनेक प्रश्नांवर उपोषणकर्ते यांनी प्रशासनाला जाब विचारला. उपोषणकर्ते हे मणक्याच्या आजाराने त्रस्त आहेत हे प्रशासनाला माहित असून सुद्धा प्रशासन याचे गांभीर्य घेत नसल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी केला. उपोषणाचा चौथा दिवस सरला असतांना देखील प्रशासन मूग गिळून गप्प का? प्रशासनाने उपोषणकर्त्यांना वाऱ्यावर सोडले असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.