सुधागड तालुक्यात सापडला दुसरा कोरोना रुग्ण तर पहिला रुग्ण झाला कोरोनामुक्त

पाली : सुधागड तालुक्यात कोरोनाचा आणखी एक रुग्ण सापडला आहे. काल संध्याकाळी गोमाशी येथील एका २४ वर्षीय तरुणाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सुधागडातील कोरोना रुग्ण संख्या २ झाली असली

 पाली : सुधागड तालुक्यात कोरोनाचा आणखी एक रुग्ण सापडला आहे. काल संध्याकाळी गोमाशी येथील एका २४ वर्षीय तरुणाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सुधागडातील कोरोना रुग्ण संख्या २ झाली असली तरी, नागशेत येथील ६२ वर्षीय  सापडलेला पहिला कोरोना रुग्ण हा बरा होऊन घरी परतल्याची दिलासादायक बातमी पुढे आली आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,२२ मे रोजी मुंबई मालाड-तानाजी नगर येथून हा तरुण आपली पत्नी व सोबत १४ वर्षीय पुतणी यांच्यासोबत गोमाशी या आपल्या गावी  आला होता. त्यानंतर त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. तसेच २५ मे ला त्याला कोरोनाची लक्षणे जाणविल्याने त्याला तात्काळ रोहा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असून त्याचे नमुने तपासणीसाठी पुढे पाठवण्यात आले. काल त्याचा कोरोना चाचणीचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये त्याला कोरोनाची लागण झाल्याचे सिद्ध झाले. त्याच्या घरातील अन्य ३ लोकांना ५ तारखेपर्यंत आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली घरातच विलगीकरण करण्यात आले आहे.