लॉकडाऊनमुळे सुधागडमधील भाजी उत्पादकांवर ओढवले आर्थिक संकट

पाली : लॉकडाऊनच्या काळात भाजी उत्पादकांवर खूप मोठे आर्थिक संकट ओढवल आहे.सुधागडचा शेतकरीदेखील आता आपल्या शेतात दुबार पद्धतीच पीक भाजीच्या माध्यमातून घेत आहे. पूर्वी काही ठराविक शेतकरीच भाजी

पाली : लॉकडाऊनच्या काळात भाजी उत्पादकांवर खूप मोठे आर्थिक संकट ओढवल आहे.सुधागडचा शेतकरीदेखील आता आपल्या शेतात दुबार पद्धतीच पीक भाजीच्या  माध्यमातून घेत आहे. पूर्वी काही ठराविक शेतकरीच भाजी पिकवत असत परंतु सध्यस्थितीत बरेच जण त्यात शेतकरी,छोटे व्यावसायिक,तरुण पिढी ही शेती व्यवसायाकडे वळलेली आहे. यावर्षी मात्र त्यांच्या पदरात निराशा पडली आहे.

 यावर्षी सुधागडात बऱ्याच ठिकाणी भाजीपाला पिकावण्यात आला.परंतु लॉकडाऊनमुळे भाजीच्या बियाण्याचादेखील खर्च निघाला नाही . कित्येक ठिकाणी भाजी उघड्यावर फेकण्याची,पशूंना खायला घालण्याची वेळ आली काही उत्पादकांनी तर भाजी वाया जाऊ नये म्हणून लोकांना भाजी मोफत वाटप केली.तर काहींनी आपल्या शेतातच भाजी सुकून घालविली. 
परळीचे उद्योजक रुपेश साळुंखे यांनीदेखील शेतीस पूरक व जोड व्यवसाय म्हणून आपल्या स्वतः च्या मालकीच्या जागेत ४ते ५ एकरात भाज्यांची लागवड केली. वेगवेगळ्या प्रकारची वांगी,भेंडी,टोमॅटो,मिरची,दुधी,काकडी,शिराली,कोथिंबीर अशा अनेक प्रकारच्या भाज्यांची लागवड त्यांनी केली. या लागवडीसाठी त्यांनी बियाणे,शेताची मशागत,त्यासाठी लागणारे नदीचे पाणी ,कीटकनाशके,औषध फवारणी,शेतात काम करणारे मजूर,शेतीसाठी लागणारी अवजारे  इत्यादींवर लाखो रुपयांचा खर्च करून भाजी लागवड केली. परंतु कोरोनाचा पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे भाजीसाठी वेळीच बाजारपेठ उपलब्ध  झाली नाही व भाज्यांनादेखील योग्य मोबदला मिळाला नाही. यामुळे एवढी केलेली मेहनत व त्यावर केलेला खर्च हा पूर्णतः वाया गेला.शेतात केलेल्या खर्चाच्या निम्मेदेखील उत्पन्न भाजीतून मिळाले नाही. यामुळे काही भाजी व्यावसायिकांचे खूप नुकसान झाले आहे.