सुतारवाडी :कोरोनामुळे देशात २३ मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. चार वेळा लॉक डाऊन वाढवण्यात आला. आता यापुढे वाढवण्याची शक्यता असून टाळेबंदीमुळे घराबाहेर पडता येत नाही की कामावर जात नाही,

सुतारवाडी : कोरोनामुळे देशात २३ मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. चार वेळा लॉक डाऊन वाढवण्यात आला. आता यापुढे वाढवण्याची शक्यता असून टाळेबंदीमुळे घराबाहेर पडता येत नाही की कामावर जात नाही, अशी अवस्था लाखो लोकांची झाली आहे. येरळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बरीच कुटुंबे नोकरीनिमित्त बाहेर शहरात गेलेली होती. त्यामुळे तिकडे राहण्यापेक्षा आपल्या गावी गेलेले बरे या उद्देशाने सुतारवाडी, गौळवाडी,  दूरटोली,  ढोकळेवाडी, कामत, सावरवाडी,  कामत आदिवासीवाडी आदी ठिकाणचे रहिवासी कामानिमित्त अलिबाग, रोहा, सुरत, विलेपार्ले, कल्याण, गोरेगाव, जळगाव, अंधेरी, विरार, धारावी,  ठाणे, दिवा, काळाचौकी, चेंबूर, पिंपरी-चिंचवड, अंबरनाथ, डोंबिवली, चेंबूर साई नगर, वरळी गांधीनगर, मुलुंड सिद्धार्थ नगर, खोपोली यशवंत नगर,  चेंबूर चिकलवाडी,  बदलापूर, नालासोपारा, पनवेल, जुईनगर,  मालाड, बोरिवली, गेवराई बीड, गावदेवी डोंगरी अंधेरी, गोरेगाव, नालासोपारा ठाणे, वाशी, खारघर, कल्याण,  उल्हासनगर आदी शहरात गेलेले रहिवासी ४ मे पासुन आपल्या गावाकडे वैद्यकीय तपासणी करून आले. अशा व्यक्तींना सुतारवाडी हायस्कूल, सुतारवाडी प्राथमिक शाळा, फार्म हाऊस, ढोकळेवाडी प्राथमिक शाळा, कामत प्राथमिक शाळा, समाज मंदिर गौळवाडी, तसेच रिकाम्या असलेल्या घरांमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले.  आमदार अनिकेत तटकरे यांनी स्वतः सुतारवाडी हायस्कुल प्राथमिक शाळा सुतारवाडी ज्या ठिकाणी व्यक्तींना सुरक्षित ठेवलेले आहेत. त्यांना  सुरक्षिततेबाबत तसेच शासनाचे नियम पाळा असे आमदार सांगत आहेत. येरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य,  समाजसेवक आलेल्या व्यक्तींना सुरक्षित ठेवून त्यांना योग्य तो सल्ला देऊन सुरक्षित राहण्याचे सांगत आहेत. रोहा तालुक्यात कोणत्याही ठिकाणी कोरोनाबाधित व्यक्ती नसली तरी जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने गेल्या सहा दिवसांपासून सुतारवाडी नाक्यावरील सर्व दुकाने अत्यावश्यक सेवा वगळून बंद ठेवण्यात आली. त्याला सर्व दुकानदारांनी तसेच रिक्षा व अन्य व्यक्तींनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. आज तगायत येरळ ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये ११५ स्त्रिया १०० पुरुष असे एकूण २१५ व्यक्ती आल्या असून ग्रामपंचायतीमार्फत योग्य ती देखरेख केली जात आहे.