तळा तालुक्यात अजून तीन कोरोना पॉझिटिव्ह – शेनाटे गावातील अर्धा परिसर सील, कंटेनमेंट झोनमध्ये नोंद

तळा : जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने राज्यातील ग्रामीण भागात आपले पाय रोवण्यास सुरुवात केली आहे.लॉकडाऊनमुळे मुंबईतून गावी आलेल्या नागरिकांमुळे ग्रामीण भागात सुद्धा दिवसेंदिवस कोरोना विषाणू

तळा : जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने राज्यातील ग्रामीण भागात आपले पाय रोवण्यास सुरुवात केली आहे.लॉकडाऊनमुळे मुंबईतून गावी आलेल्या नागरिकांमुळे ग्रामीण भागात सुद्धा दिवसेंदिवस कोरोना विषाणू फोफावत असल्याचे पाहायला मिळत आहे.तळा तालुक्यातील तळेगाव येथे पहिला कोरोना रुग्ण आढळून आला तो निगेटिव्ह होऊन परतताच त्यापाठोपाठ चरई बुद्रुक येथे दुसरा कोरोनाबाधित आढळून आला. रविवारी शेणाटे येथे एकाच कुटुंबातील तिघांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे तळा तालुक्यातील कोरोना धितांचा आकडा ४ वर पोहचला आहे. १४ मे रोजी हे तिघेही बोरिवली येथून आपल्या गावी शेणाटे येथे आले होते.यामध्ये एक स्त्री वय वर्षे(४०) तर दोन पुरुष एकाचे वय ४५ तर दुसऱ्याचे वय २९ आहे. हे तिघेही एकाच कुटुंबातील असून त्यांच्यामध्ये लक्षणे आढळून आल्याने त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले असता त्या तिघांचेही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. पाॅझिटीव्ह रूग्णाच्या परिसरातील अर्धे गाव सील करण्यात आले असून कंटेनमेंट झोनमध्ये नोंद करण्यात आली आहे.  त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.