तळा तालुक्यातील कोरोना रुग्णाच्या संपर्कातील दोघांचा अहवाल निगेटीव्ह, कोरोनाबाधिताच्या प्रकृतीतही सुधारणा

तळा: तळा तालुक्यात आढळून आलेल्या कोरोना रुग्णाच्या संपर्कातले हाय रिस्कमध्ये असलेल्या दोन्ही व्यक्तींचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आज त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून सर्वांचे नमुने

तळा: तळा तालुक्यात आढळून आलेल्या कोरोना रुग्णाच्या संपर्कातले हाय रिस्कमध्ये असलेल्या दोन्ही व्यक्तींचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आज त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून सर्वांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे तळा तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तळा तालुक्यातील तळेगाव येथील एका २० वर्षीय तरूणाला कोरोनाची लागण झाली होती त्या तरूणांसोबत मुंबई (धारावी) ते तळेगाव असा त्याची आई व भाऊ यांनी प्रवास केल्याने त्यांचेही स्वॅब तपासणीसाठी एम जी एम पनवेल येथे पाठविण्यात आले होते. त्या दोघांचेही स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आले असून कोरोनाची लागण झालेल्या तरूणाची प्रकृती  सुधारते आहे. त्यामुळे तळा तालुक्यातील नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही असे तहसीलदार ए. एम.कनशेट्टी यांनी सांगितले. तळा तालुक्यात गेल्या अडीच महिन्यापासून तहसिलदार अण्णप्पा कनशेट्टी, नायब तहसिलदार खरोडे व सहकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ अमोल बिरवटकर व सहकारी, नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रेश्माताई मुंढे, मुख्याधिकारी माधुरी मडके, सर्व कर्मचारी आणि  पोलीस निरीक्षक सुरज गेंगजे व त्यांची टीम अहोरात्र मेहनत करीत असल्यानेच तळा तालुका कोरोनामुक्त होतो आहे.