निसर्ग चक्रीवादळामुळे तळा प्राथमिक आरोग्य केंद्र व डॉक्टरांच्या निवासस्थानाची पडझड

तळा : निसर्ग चक्रीवादळामुळे तळा तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असतानाच या चक्रीवादळाचा फटका तळा प्राथमिक आरोग्य केंद्र व त्या शेजारीच असणाऱ्या डॉक्टरांच्या निवासस्थानाला देखील बसला आहे. बुधवारी

तळा : निसर्ग चक्रीवादळामुळे तळा तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असतानाच या चक्रीवादळाचा फटका तळा प्राथमिक आरोग्य केंद्र व त्या शेजारीच असणाऱ्या डॉक्टरांच्या निवासस्थानाला देखील बसला आहे. बुधवारी आलेल्या निसर्ग चक्रीवादळात प्राथमिक आरोग्य केंद्राचे छप्पर उडाले असून यामुळे  केंद्रातील सर्वच विभागात पावसाच्या पाण्याची गळती लागली आहे.या आपत्त मध्ये पाण्याची टाकीसुद्धा फुटली आहे तसेच औषधे आणि इंजेक्शन कक्षावरील देखील छप्पर उडाल्यामुळे रुग्णांना औषध व इंजेक्शन देण्यासाठी येथील डॉक्टरांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. यासह प्राथमिक आरोग्य केंद्राशेजारी असलेल्या डॉक्टरांच्या  निवासस्थानाची देखील मोठी पडझड झाली आहे.चक्रीवादळात छप्पर उडून जाऊन भिंतीना भेगा पडल्या आहेत. छतावरून पाणी खोलीत शिरल्याने खोलीतील पीओपी व पंखा दोन्ही कोसळले आहेत. सुदैवाने त्यावेळी खोलीत कोणीही नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र चक्रीवादळात डॉक्टरांच्या निवासस्थानाची मोठी पडझड झाल्याने येथील डॉक्टरांना रात्रीत आपल्या सामानासह सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याची वेळ आली. तळा तालुक्याला एकच प्राथमिक आरोग्य केंद्र असल्यामुळे खेड्यापाड्यातील बऱ्याचशा नागरिकांची आजारपणामुळे आरोग्य केंद्रात गर्दी असते. मात्र आज चार दिवसानंतरही छपराची दुरुस्ती न केल्यामुळे येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तरी संबंधित विभागाने त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्र व डॉक्टरांच्या निवासस्थानाची डागडुजी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.