तळा नगरपंचायतीकडून बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे थर्मल चेकअप

तळा : संपुर्ण जगावर कोसळलेल्या कोरोना विषाणूच्या संकटाचा भारतात वाढता प्रादुर्भाव पाहता त्याला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्रातील शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता

 तळा : संपुर्ण जगावर कोसळलेल्या कोरोना विषाणूच्या संकटाचा भारतात वाढता प्रादुर्भाव पाहता त्याला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्रातील शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्ष्यात घेता प्रशासनाने त्यावर उपाययोजना करण्यासाठी कंबर कसली आहे.त्याचाच एक भाग म्हणून तळा नगरपंचायतीकडून बुधवारी सर्व व्यापाऱ्यांचे थर्मल चेकअप करण्यात आले.तिसऱ्या लॉकडाऊननंतर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानांसोबतच इतर दुकानांनाही परवानगी देण्यात आल्याने तळा बाजारपेठेत नागरिकांची गर्दी वाढली आहे. तसेच दिवसेंदिवस मुंबईतून मोठ्या प्रमाणावर नागरिक गावाला येत असून काही नागरिक हे क्वारंटाईनचे शिक्के मारून आल्यानंतर बाजारपेठेतुन जात असल्याचे निदर्शनास आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तळा नगरपंचायतीकडून बाजारपेठेतील भाजी विक्रेते,किराणा विक्रेते,यांसह सर्व व्यापाऱ्यांचे थर्मल चेकअप करण्यात आले. याप्रसंगी मुख्याधिकारी माधुरी मडके, नगराध्यक्षा रेश्मा मुंढे, नगरसेवक चेतन चव्हाण व नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.