तळा नगरपंचायतीला मिळणार वावे धरणातून पाणी – नवीन पाणी पुरवठा योजनेला मंजुरी

तळा: तळा नगरपंचायत हद्दीतील पाण्याची समस्या निकाली काढण्यासाठी तसेच नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यास आज शासनातर्फे मंजूरी मिळाली आहे. वावे लघुपाटबंधारे योजनेतून तळा नगरपंचायतीला पाणीसाठा

तळा: तळा नगरपंचायत हद्दीतील पाण्याची समस्या निकाली काढण्यासाठी तसेच नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यास आज शासनातर्फे मंजूरी मिळाली आहे. वावे लघुपाटबंधारे योजनेतून तळा नगरपंचायतीला पाणीसाठा आरक्षित करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील तळा नगरपंचायत हद्दीत पाण्याचासाठा कमी असल्याकारणाने पाण्याची समस्या निर्माण होत असल्याने नगरपंचायतीने मौजे वावे हवेली येथील लघु पाटबंधाऱ्यातून पाणीसाठा उपलब्ध व्हावा, याकरिता नवीन पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. 

यासंदर्भात तळा नगरपंचायतीच्या वतीने लोकप्रतिनिधींनी राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री आदिती तटकरे यांची भेट घेवून समस्या मांडली होती. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी तात्काळ दखल घेत राज्याचे जलसंपदा मंत्री  जयंत पाटील यांच्याकडे संबंधित विषयावर बैठक घेवून वावे लघुपाटबंधारे योजनेतून तळा नगरपंचायतीस पाणीसाठा उपलब्ध करून देण्याकरिता नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करून मिळणेबाबत मागणी केली होती. या मागणीला अनुसरून आज तळा नगरपंचायतीस वावे लघुपाटबंधारे योजना, मौजे वावे-हवेली,ता. तळा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यातून पाणी वापरासाठीचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला आहे. नगरपंचायतीस नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्याने येथील जनतेच्या पाण्याची समस्या मिटणार आहे.