There will be no more autopsy; Home Department Order

तरुणासोबत जबरदस्तीने समलैंगिक संबंध(Gay Relation) ठेवण्यात आले होते. तसेच बदनामीची भीती दाखवून त्याला ब्लॅकमेल(Blackmail) करण्यात येत होते. याच त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या(Suicide) केली.

    महाड :चवदार तळ्यात (Chavdar Tale)३ जुलै रोजी तरुणाने केलेल्या आत्महत्येचे(Suicide In Chavdar Tale) गूढ महाड शहर पोलिसांनी उलगडले आहे.तरुणासोबत जबरदस्तीने समलैंगिक संबंध(Gay Relation) ठेवण्यात आले होते. तसेच बदनामीची भीती दाखवून त्याला ब्लॅकमेल करण्यात येत होते. याच त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली. या प्रकरणी एक प्राथमिक शिक्षक आणि त्याचा साकडी येथील एक साथीदार अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    साकडी येथून १ जुलैपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह ३ जुलै रोजी महाडमधील चवदार तळ्याच्या पात्रात आढळून आला होता. या आत्महत्येचा तपास करताना पूर्वी महाड तालुक्यात आणि आता सांगली जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या जीनेश्वर काडापुरे याने त्याला प्रेमाचे आमिष दाखवून त्याच्या बरोबर समलैंगिक संबंध प्रस्थापित केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. काडापुरे आणि त्याचा साकडी येथील साथीदार अनिल हिरवे हे दोघे याच समलैगिक संबंधाचे भांडवल करून बदनामी करण्याची धमकी देत त्याला ब्लॅकमेल करीत होते. याच प्रकाराला कंटाळून या तरुणाने आत्महत्या केली.

    या तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा ठपका ठेवित जीनेश्वर काडापुरे आणि अनिल हिरवे या दोघांविरुद्ध भा.दं.वि. कलम ३६०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक लोणे हे करित आहेत. दोन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.