‘तो’ शिक्षक विनावेतन झाला निवृत्त

पेण: पेण तालुक्यातील वरेडी गावातील रमण पाटील हे शिक्षक सुधागड एज्युकेशनच्या रावे शाळेवर जून १९९७ मध्ये माध्यमिक विभागात हजर झाले. घरातील पहिलाच मुलगा बीए बीएड झाल्यामुळे घरात आनंद होता आणि

 पेण: पेण तालुक्यातील वरेडी गावातील रमण पाटील हे शिक्षक सुधागड एज्युकेशनच्या रावे शाळेवर जून १९९७ मध्ये माध्यमिक विभागात हजर झाले. घरातील पहिलाच मुलगा बीए बीएड झाल्यामुळे घरात आनंद होता आणि त्वरित शाळेवर रुजू झाल्यामुळे पेशाने टेलर असणाऱ्या वडिलांना खूप आनंद झाला. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते.

रमण पाटील  शाळेवर लागल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांचे लग्न करायचे ठरविले आणि भालगावच्या पेशाने नर्स असणाऱ्या माधवी नामक मुलीशी लग्न लावून संसार थाटून दिला. त्यानंतर या दोघांनी आपला संसार करण्यास सुरुवात केली. आपल्या नवऱ्याला आज, उद्या, परवा एक महिन्यात एक वर्षात पगार मिळेल या आशेवर माधवी आपल्या संसाराचा गाडा आजपर्यंत हाकत आली. हे सर्व करत असताना संस्थाचालकांच्या घराचे उंबरठे झिजवूनसुद्धा काही उपयोग झाला नाही.  सर्व प्रवासात पुलाखालून खूप पाणी वाहून गेले. माधवी पाटील व रमण पाटील  यांनी खूप संघर्ष केला. मात्र २३ वर्षाच्या प्रदीर्घ लढाईत यांना काही यश आलं नाही शेवटी ३१मे२०२० रोजी वयाच्या ५८ व्या वर्षी रमण पाटील हे रावे हायस्कूलवरच २३ वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले.या सर्व गोष्टीवरून एकच म्हणता येईल की एक कम नशिबी शिक्षक विनावेतन निवृत्त झाला.