न्यू इंग्लिश स्कूल वलंग येथे शिक्षक दिन झाला साजरा

कोरोनाच्या महामारीमुळे विद्यार्थ्यांची अनुपस्थिती मात्र प्रकर्षाने जाणवत होती.यावेळी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन,महात्मा ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.तसेच सर्व कर्मचाऱ्यांना मुख्याध्यापकांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले.

महाड : वलंग शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल वलंग येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरा झाला.कोरोनाच्या महामारीमुळे विद्यार्थ्यांची अनुपस्थिती मात्र प्रकर्षाने जाणवत होती.यावेळी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन,महात्मा ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.तसेच सर्व कर्मचाऱ्यांना मुख्याध्यापकांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले.तसेच मुख्याध्यापकांचा देखील सर्वांनी मिळून गौरव केला.मा.मुख्याध्यापक कुर्डुनकर आर एम यांनी सर्वांना या दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

कोरोना काळात आपण एकमेकांना साहाय्य करून शिक्षण प्रक्रियेशी बांधले जाऊ या,असे ते यावेळी म्हणाले.संस्थेचे संस्थापक आदरणीय कुर्डुनकर गुरुजी यांचादेखील आज वाढदिवस असतो,यानिमित्ताने घरी जाऊन सर्वच कर्मचाऱ्यांनी गुरुजींना शुभेच्छा दिल्या.यावेळी अनौपचारिकरित्या मार्गदर्शन करताना संस्था आणि शाळा यांच्या संवर्धनासाठी,गुणवत्तेसाठी सर्वांनी नेहमीप्रमाणे प्रयत्न करीत राहा,असे ते म्हणाले.या छोटेखानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साळवी सरांनी केले,तर आभार गुदडे सरांनी मानले.