पनवेल महापालिकेने रस्त्यावरील विक्रेत्यांची आरोग्य तपासणी करणे गरजेचे – तेजस कांडपिळे

पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात अनेक भाजी आणि फळ विक्रेते रस्त्यावर किंवा फुटपाथवर बसून विक्री करीत आहेत.यापैकी अनेकांना ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसत असतान ही ते दवाखान्यात जाऊन उपचार घेत

पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात अनेक भाजी आणि फळ विक्रेते रस्त्यावर किंवा फुटपाथवर बसून विक्री करीत आहेत.यापैकी अनेकांना ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसत असतान ही ते दवाखान्यात जाऊन उपचार घेत नसल्याचे लक्षात येत आहे. नागरिकांच्या आरोग्याला हे घातक असल्याने अशा विक्रेत्यांची नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे असल्याची मागणी प्रभाग समिती ‘ड’ चे अध्यक्ष तेजस कांडपिळे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. 

     पनवेल महापालिका क्षेत्रात लॉकडाऊन उठवल्यावर अनेक भाजी आणि फळ विक्रेते रस्त्यावर किवा फुटपाथवर बसून विक्री करीत आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण सापडत आहेत. नवीन पनवेलमध्ये ए टाईप मध्ये  फळ विक्रेत्याला कोरोना झाल्यामुळे अनेकांना त्याचा संसर्ग झाल्याचे दिसून आले असताना ही नवीन पनवेलमध्ये अनेक विक्रेते कोणतीही काळजी न घेता धंदा करीत आहेत. सेक्टर १५ मधील फळ विक्रेता ताप , खोकला असताना धंदा करीत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे,  हा प्रकार धोकादायक आहे . त्यामुळे कोरोनाच वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांना संसर्ग होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो म्हणून  महापालिकेने रस्त्यावरील  विक्रेत्यांची ठराविक कालावधी नंतर आरोग्य तपासणी करूनच त्यांना धंदा करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी तेजस कांडपिळे  यांनी पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे.