mahad city

गेल्या तीन-चार दिवसांपासून महाड(mahad) शहरासह(temperature rise in mahad) औद्योगिक वसाहतीमध्ये दुपारी १२ ते ३ या वेळेत पारा चाळीस अंशांच्या पुढे जात आहे. विशेष म्हणजे पहाटेच्या वेळेस कमालीचा गारवा आणि सूर्योदयानंतर कडाक्याचे ऊन असे विचित्र वातावरण अनुभवायला येत आहे.

  रोहन शिंदे, महाड: मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच महाडकरांना सूर्याच्या संतापाचा सामना करावा लागत आहे. पाऱ्याने गेल्या काही दिवसांपासून चाळीशी ओलांडायला सुरुवात केली आहे. परिणामी, लॉकडाऊननंतर प्रथमच दुपारच्या वेळेस संचारबंदी असल्यासारखे चित्र महाड बाजारपेठेत पाहावयास मिळत आहे.

  गेल्या तीन-चार दिवसांपासून महाड शहरासह औद्योगिक वसाहतीमध्ये दुपारी १२ ते ३ या वेळेत पारा चाळीस अंशांच्या पुढे जात आहे. विशेष म्हणजे पहाटेच्या वेळेस कमालीचा गारवा आणि सूर्योदयानंतर कडाक्याचे ऊन असे विचित्र वातावरण अनुभवायला येत आहे. एकीकडे कोरोनाचे संकट कायम असताना दुसरीकडे कडाक्याचे ऊन मानवी त्याचप्रमाणे पशुपक्ष्यांच्या आरोग्याला घातक असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

  गरज असेल तरच घराबाहेर पडा, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी घराबाहेर पडण्याचे टाळावे असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. भास्कर जगताप यांनी या पार्श्वभूमीवर केले आहे.

  कशी काळजी घ्याल
  उष्णतेमुळे शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते म्हणून काळजी घेण्याची गरज आहे.अन्यथा उष्णतेचे अनेक विकार जाणवू लागतात. यावर उपाय म्हणजे जास्त पाणी पिणे आणि व्यायाम करणे गरजेचे आहे.

  sugarcane juice centre

  वाढत्या तापमानामुळे शीतपेयांच्या,उसाच्या रसाच्या विक्रीत वाढ
  कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांना उन्हाच्या तडाख्यात शीतपेये, रसवंतीगृहे दिलासादायक वाटत असल्यामुळे शीतपेयांना व उसाच्या रसाला ग्राहकांची मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे.उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत असते. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी शीतपेय घ्यावे लागत आहे.