
लग्नाच्या वऱ्हाडाचा टेम्पो दीडशे फूट दरीत कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना शुक्रवारी संध्याकाच्या सुमारास रायगडमध्ये घडली. तीन ठार तर ६१ जण जखमी झाले आहेत. सातारा येथे लग्न सोहळा आटोपून हे वऱ्हाड खेडला परत येत असताना ही दुर्दैवी घटना घडली.
पोलादपूर : लग्नाच्या वऱ्हाडाचा टेम्पो दीडशे फूट दरीत कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना शुक्रवारी संध्याकाच्या सुमारास रायगडमध्ये घडली. तीन ठार तर ६१ जण जखमी झाले आहेत. सातारा येथे लग्न सोहळा आटोपून हे वऱ्हाड खेडला परत येत असताना ही दुर्दैवी घटना घडली.
सातारा जिल्ह्यातील कुमटे-कोंडोशी येथून लग्नकार्य आटपून वऱ्हाड रत्नागिरी जिल्ह्यातील खेड-खवटी येथे परतत होते. यावेळी पात्री खिंडीत एका वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
महाड, महाबळेश्वर आणि खेड येथून चार ट्रॅकर्सच्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. रात्रीच्या अंधारात दरीत पडलेल्यांचा शोध घेताना अनेक अडथळे येत होते. शनिवारी सकाळपर्यंत २० पेक्षा अधिक अपघात ग्रस्तांना दरीतून बाहेर काढम्यात ट्रॅकर्सना यश आले. अपघातातील जखमींना महाड, पोलादपूर येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.
विठ्ठल बक्कु झोरे (६५, रा. खवटी ता. खेड), तुकाराम दत्तू झोरे (४०,रा. कावले, कुंभारडे ता. महाड), भावेश हरिश्चंद्र होगाडे (२३, रा. तुळशी धनगर वाडी) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. मात्र अपघात एवढा भीषण आहे की जखमींची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे.