The bodies of three members of the same family were found hanging from a tree; Sensation in Shahapur village over suspicious death

एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह झाडाला गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळल्याचा धक्कादायक प्रकार शहापुरमध्ये उघडकीस आला आहे. यामुळे चांदा गावात एकच खळबळ उडाली आहे.

कसारा : एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह झाडाला गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळल्याचा धक्कादायक प्रकार शहापुरमध्ये उघडकीस आला आहे. यामुळे चांदा गावात एकच खळबळ उडाली आहे.

आज सकाळच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, आत्महत्या की घातपात अशा चर्चेला उधाण आले आहे. नितीन भेरे, महेंद्र दुभेले, मुकेश घावट अशी मृतांची नावे आहेत.

महेंद्र आणि मुकेश यांच्यात मामा भाच्याचे नाते होते. तर नितीनही त्यांचा नातेवाईकच होता. १४ नोव्हेंबर २०२० रोजी हे तिघे घरातून बाहेर पडले होते. त्या दिवसानंतर तिघेही घरी न परतल्याने त्यांचा नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला. दोन दिवस झाले तरी तिघांचा सुगावा लागत नसल्याने नातेवाईकांनी १७ नोव्हेंबर रोजी शहापुर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची फिर्याद नोंदवली.

मात्र, शुक्रवारी सकाळी त्यांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने सर्वांना  धक्काच बसला.