आंबेत पोलीस चेक पोस्टने दत्तक घेतलेल्या मुलाने घडवले स्वतःचे भविष्य

  • रायगड जिल्ह्यातील आंबेत सावित्री माध्यमिक विद्यालयाचा निकाल देखील ९३.७३ टक्के लागल्यान पुन्हा एकदा आंबेत परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी याच शाळेत शिकत असलेल्या एका बेघर झालेल्या कु.ऋतिक मोहन गोठल या विद्यार्थ्याने शेकडा ७८.६०% गुण मिळवून या शाळेत द्वितीत क्रमांकाचा मान पटकावला. याबरोबरच त्याने आपल्या आई वडिलांचे नाव सुद्धा मोठे केलं आहे.

म्हसळा : नुकताच जाहीर झालेल्या इयत्ता दहावीच्या निकालामध्ये कोंकण विभागाने पुन्हा एकदा बाजी मारत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावत अव्वल स्थान मिळवले आहे. त्यामध्येच अनेक विभागात माध्यमिक शाळांचा निकाल देखील १०० टक्के लागल्याचे दिसून येत आहे. यामध्येच रायगड जिल्ह्यातील आंबेत सावित्री माध्यमिक विद्यालयाचा निकाल देखील ९३.७३ टक्के लागल्यान पुन्हा एकदा आंबेत परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी याच शाळेत शिकत असलेल्या एका बेघर झालेल्या कु.ऋतिक मोहन गोठल या विद्यार्थ्याने शेकडा  ७८.६०%  गुण मिळवून या शाळेत द्वितीत क्रमांकाचा मान पटकावला. याबरोबरच त्याने आपल्या आई वडिलांचे नाव सुद्धा मोठे केलं आहे.           

एकीकडे या विद्यार्थ्याला आईची सावली नसल्याने तसेच पित्याचे सहकार्य होत नसल्याने याच विभागातील आंबेत येथे असणारे पोलीस गणेश पवार, सारंगे व त्यांचे सहकारी यांनी या विद्यार्थ्याला इयत्ता नववी कक्षापासून दत्तक घेऊन आपल्या पोलीस चेक पोस्टमध्ये आसरा दिला. त्यानंतर या मुलावर त्यांनी सातत्याने शिक्षणाची जाणीव निर्माण करत या मुलावर चांगले संस्कार देखील घडवल्याने आज या मुलाने आपल्यावर पोलीस वर्गाने दाखवलेली माया सार्थकी लावली आणि आपल्या आई वडिलांचे नाव देखील उज्ज्वल केलं आहे. त्यामुळे आंबेत खाडीपट्टा परिसरातून तसेच गोरेगाव पोलीस ठाणे यांच्या वतीने दहावी इयत्तेत घवघवीत यश संपादन केलेल्या कु.ऋतिक गोठलं या विद्यार्थ्याचे कौतुक केले आहे. तसेच मुलाला मातृत्वाची छाया देणाऱ्या पोलीस वर्गांचे देखील कौतुक होत आहे.