chor

वडील घरी नसताना घरातील कपाटात ठेवलेली अंदाजे वीस हजार रुपये किंमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन आणि तीन हजार रुपये किंमतीची दीड ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी देखील लंपास करुन एकूण सहा लाख तेवीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

महाड : वडिलांचे एटीएम कार्ड (ATM Card) वापरून त्यांच्या बँक खात्यातील (Bank Account) सहा लाख रुपये आणि घरातील २३ हजारांचे दागिने लंपास करणाऱ्या दिवट्या मुलाविरोधात महाड शहर पोलिसांनी (Police)  गुन्हा दाखल केला आहे. घरातील २३ हजार रुपये किंमतीचे दागिने देखील या मुलाने लंपास ( Jewelry Riots) केले.

महाड शहर (Mahad City)  पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी किशोर कोंडीराम जागडे (Kishor Jagde)  (वय ५९, रा. सरेकर आळी, महाड) यांनी विश्वासाने आपले एटीएम कार्ड आपला मुलगा ऋषिकेश किशोर जागडे (वय ३२, रा. सरेकर आळी, महाड) याच्या ताब्यात दिले होते. आपल्या वडीलांचा विश्वासघात करित, ऋषिकेशने या एटीएम कार्डचा वापर करित, वेळोवेळी वडिलांच्या खात्यातून सहा लाख रुपये काढले.

त्याचप्रमाणे वडील घरी नसताना घरातील कपाटात ठेवलेली अंदाजे वीस हजार रुपये किंमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन आणि तीन हजार रुपये किंमतीची दीड ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी देखील लंपास करुन एकूण सहा लाख तेवीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

या प्रकरणी महाड शहर पोलिसांनी आरेापी ऋषिकेश किशोर जागडे यांच्या विरोधात भा. दं. वि. कलम ३८०, ४०६, ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. सणस यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. फौजदार श्री. थवई हे अधिक तपास करित आहेत.