परतीचा पाऊस स्थिरावला हवामान खात्याचा अंदाज खरा ठरण्याची शक्यता

यावर्षी ऑगस्ट महिन्यात कोसळलेल्या पावसानी मागील ४५ वर्षाचे विक्रम मोडले होते. चालू सप्टेंबर महिन्यात म्हणावा तसा पाऊस बरसला नाही. आज तब्बल ३७ मि.मी. पावसाची नोंद होताना यावर्षाचा आत्ता पर्यत ३०९८ मि.मी सरासरी पावसाची नोंद झालेली आहे. ती मागील वर्षाच्या तुलनेत कमी झालेली आहे.

महाड : गेल्या पंधरा दिवसांत कमी अधीक कोसळणारा पाऊस (rains) आता परतीच्या प्रवासाला निघेल अस वाटत असतांना मंगळवार, बुधवार पावसानी दमदार (heavy rain) हजेरी लावली आहे. यामुळे परतीचा पाऊस पुन्हा सक्रीय (return rains stabilize)  होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

दरम्यान प्रतिवर्षी ऑक्टोबर हिट ही सप्टेंबरच्या २० तारखेनंतर सुरु होते. मात्र, यावर्षी ती सप्टेंबर सुरुवातीलाच सुरु झाल्याने नागरिकांची उष्म्यानी चांगलीच लाही – लाही झाल्याचे पहावयास मिळाले. यावर्षी हवामान खात्यानी (meteorological department) पाऊस सरासरी ९८ % तर तो ऑगस्ट सप्टेंबर मध्ये कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. तो आत्ता पुन्हा खरा ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

यावर्षी ऑगस्ट महिन्यात कोसळलेल्या पावसानी मागील ४५ वर्षाचे विक्रम मोडले होते. चालू सप्टेंबर महिन्यात म्हणावा तसा पाऊस बरसला नाही. आज तब्बल ३७ मि.मी. पावसाची नोंद होताना यावर्षाचा आत्ता पर्यत ३०९८ मि.मी सरासरी पावसाची नोंद झालेली आहे. ती मागील वर्षाच्या तुलनेत कमी झालेली आहे.

विशेष म्हणजे भाताच कोठार समजल जाणाऱ्या रायगड आणि संपूर्ण कोकणात भातशेती हे मुख्यपिक असल तरी ते पावसाच्या लहरीपणावर पुर्णतः अवलंबून असत. यावर्षाची भातशेती आता पर्यंत उत्तम असल्याने सध्यातरी बळीराजा आनंदी आणि सुखावला आहे. हळवी पिके तयार झाली असून ती डौलानी नाचत आहेत. सध्या कोसळत असलेला पाऊस या पिकांना चांगलाच धोकादायक आहे.

हवामान खात्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार सप्टेंबर मध्ये पण पाऊस कोसळणार असल्याच म्हटलय ते खरे ठरल्यास पुन्हा अतिवृष्टी आणि भातशेतीच मोठ नुकसान होण्याच नाकारता येत नाही. प्रतिवर्षी पावसाच आगमन आणि परतावा प्रचंड ढंगाच्या आणि विजांच्या गडगडाटानी होत असत. मात्र, यावर्षी ते सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला झाल्याने पावसाचा परतीचा प्रवास हवामान खातच फक्त सांगू शकत एवढ निश्चित.