श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते येथील प्रभू विश्वकर्मा मंदिरांचे निसर्ग चक्रीवादळात मोठ्या प्रमाणात नुकसान

  • संपूर्ण महाराष्ट्रत सुप्रसिद्ध असलेल्या विश्वकर्मिय कारागिरांचे व सर्व स्तरातील कारागीर वर्गाचे श्रद्धास्थान असलेले विश्वकर्मिय लोहार सुतार समाज ता. श्रीवर्धन, म्हसळा, मुरुड या रायगड विभागीय संघटनेचे प्रभू विश्वकर्मा मंदिर भोस्ते, ता. श्रीवर्धन, जि. रायगड येथे आहे. हे मंदिर सर्व स्तरातील कारागीर वर्गाचे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध आहे.

श्रीवर्धन – ३ जून २०२० रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळात श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते येथील प्रभू विश्वकर्मा मंदिराचे फार मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रत सुप्रसिद्ध असलेल्या विश्वकर्मिय कारागिरांचे व सर्व स्तरातील कारागीर वर्गाचे श्रद्धास्थान असलेले विश्वकर्मिय लोहार सुतार समाज ता. श्रीवर्धन, म्हसळा, मुरुड या रायगड विभागीय संघटनेचे प्रभू विश्वकर्मा मंदिर भोस्ते, ता. श्रीवर्धन, जि. रायगड येथे आहे. हे मंदिर सर्व स्तरातील कारागीर वर्गाचे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध आहे.

मंदिरालगत असलेला मुख्य भव्य सभागृह व मंदिराच्या दक्षिणेकडील बाजूला सभागृह व कार्यक्रम सभागृह आणि मंदिरलगत उत्तर दिशेकडील महाप्रसादाकरिता उभारलेला सभामंडप व भोवताली असलेले वॉल कंपाऊंड मंदिरासमोर असलेले भव्य प्रांगण व आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर त्यामुळे सहाजिकच आलेल्या भक्तगणांना आल्हाददायक वाटते व प्रत्येक भाविक व्यक्ती सभागृहात पाय ठेवताच नतमस्तक होते. सदरचे मंदिर भोस्ते, ता. श्रीवर्धन, जि. रायगड येथे गेली चाळीस ते पंचेचाळीस वर्षापूर्वी उदयास आले असून दि. ०९/०२/२००६ प्रभु विश्वकर्मा मंदिराअंतर्गत विश्वकर्मामूर्तीची व श्री गणेश मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली असून दि.१०/०२/२००६ रोजी पासून फार मोठ्या प्रमाणात श्री. विश्वकर्माजयंती महोत्सव महाप्रसादासह हजारोंच्या उपस्थितीत संपन्न होत असतो. 

दि. ०३ जून २०२० रोजी झालेल्या निसर्ग  चक्रीवादळात सदर मंदिराचे ८५ ते ९० टक्के नुकसान झालेले आहे. दोन सभागृह एक सभामंडप यावरील बहुतांशी छतांच नुकसान झाले असून भोवतालचे वॉल कंपाऊंड जमीनदोस्त झाले आहे.  मंदिराच्या दुरुस्तीकरता व नूतनीकणासाठी सर्व स्तरावरील विशेषत: विश्वकर्मी वंशाचे सर्व कारागीर वर्गाने तसेच दानशूर मंडळींनी सढळ हस्ते आर्थिक मदत करण्यासाठी पुढे यावे. असे आवाहन मंदिराच्या ट्रस्टने केले आहे.