सुतारवाडी नाक्यावर ए.टी.एम ची आवश्यकता, अनेक वाड्यांचा प्रश्न सुटेल

सुतारवाडी नाका नेहमी गजबजलेला असतो. या ठिकाणी एका बँकेची अत्यंत गरज आहे. किंवा ए.टी.एम असेल तरी अनेक नागरिकांची सोय होईल. बॅंकेतून पैसे काढण्यासाठी कोलाड येथे काहींना १० किमी तर काहींना १५ किमी ते २० किमी अंतर पार करून वेळ वाया घालवून जावे लागते.

सुतारवाडी : सुतारवाडी नाक्यावर कोणत्याही एका बँकेच्या ए.टी.एम ची अत्यंत आवश्यकता असून असे झाल्यास सुतारवाडी, सावरवाडी, धगडवाडी, जामगाव, आटलेवाडी, जाधववाडी, ढोकळेवाडी, जावटे, कुडली, खैरवाडी, आंबिवली तसेच या परिसरामध्ये असलेल्या आदिवासी वाड्यांना मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार आहे. (need for ATMs at Sutarwadi Naka) सुतारवाडी हे गाव अनेक गावांचे मध्यवर्ती ठिकाण असून येथे हॉटेल्स, किराणा दुकानं, सलून, मिठाई दुकान, ब्युटी पार्लर, कटलरी सामान, टेलर, कपड्याचे दुकान, एम.एस.ई.बी कार्यालय, मोबाईल रिचार्ज, फोटो स्टुडिओ, हायस्कूल, प्राथमिक शाळा, भाजी दुकान, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, खाजगी दवाखाने, पिठाच्या गिरण्या, रिक्षा अशा विविध सुविधा असून या परिसरात अनेक सुसज्ज असे फार्महाऊस सुद्धा आहेत.(ATMs at Sutarwadi Naka will solve the problem)

त्यामुळे सुतारवाडी नाका नेहमी गजबजलेला असतो. या ठिकाणी एका बँकेची अत्यंत गरज आहे. किंवा ए.टी.एम असेल तरी अनेक नागरिकांची सोय होईल. बॅंकेतून पैसे काढण्यासाठी कोलाड येथे काहींना १० किमी तर काहींना १५ किमी ते २० किमी अंतर पार करून वेळ वाया घालवून जावे लागते. सुतारवाडी नाक्यावर ए.टी.एम किंवा बँक झाल्यास अनेक नागरिकांचा वेळ तर वाचेलच परंतु कमी वेळेत पैसे काढून आपली इतर कामे उरकता येतील.

सुतारवाडी येथून पुणे १०० किमी अंतरावर असल्यामुळे येथून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. या परिसरात राहणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सुतारवाडी नाक्यावर ए.टी.एम किंवा बँक असणे अत्यंत गरजेचे आहे. तसे झाल्यास येथील विविध वाड्यांचा प्रश्न मार्गी लागेल.