The Neral-Matheran ghat road collapsed

    नेरळ : मुसळधार पावसाचा जबरदस्त फटका प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या माथेरान परिसराला देखील बसला आहे.मुसळधार पावसामुळे नेरळ-माथेरान घाटरस्त्यात दरड कोसळली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

    आज सायंकाळच्या सुमारास  नेरळ माथेरान घाटरस्त्यात दरड कोसळली. मागील दोन दिवसांपासून माथेरानमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ही दरड रस्त्यावर कोसळली.

    नेरळ पोलीस व नेरळ माथेरान टॅक्सी चालक मालक संघटनेच्या चालकांनी रस्त्यावरील दरड बाजूला करत रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन मोठे दगड हटवणे अवघड झाले. यामुळे जेसीबीच्या सहहायने दरड बाजूला करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आलेत.