mahad police house

महाड उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या पोलिस ठाण्यांमधील पोलिस वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आ्रहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था तसेच नागरिकांच्या मालमत्तेची सुरक्षा अबाधित राखण्याचे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर कायम उभे आहे.

महाड : महाड शहरातील पोलीस वसाहती (police colony in Mahad ) मधील सदनिका लवकरच पोलीस कुटुंबांना उपलब्ध करून देण्यात याव्यात यासाठी आपण मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याची माहिती महाडचे आमदार भरत गोगावले (MLA Bharat Gogavale) यांनी दिली. त्याच प्रमाणे महाड उपविभागातील पोलीस ठाण्यांतील रिक्त पदे भरण्यात यावीत यासाठी देखील पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाड उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या पोलिस ठाण्यांमधील पोलिस वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आ्रहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था तसेच नागरिकांच्या मालमत्तेची सुरक्षा अबाधित राखण्याचे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर कायम उभे आहे. पोलिस कर्मचाऱ्यांच्या अनेक रिक्त पदांमुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत असल्याची बाब समोर आली आहे.ॉ

महाड उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यक्षेत्रामध्ये महाड शहर, महाड तालुका, महाड एमआयडीसी, पोलादपूर या पोलिस ठाण्यामध्ये मंजुरी पदाच्या तुलनेने हजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत असून त्यांच्या स्वास्थ्यावर त्याचा विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे.

महाड तालुक्यामध्ये एक नगरपालिका, १३४ ग्रामपंचायती, औद्योगिक वसाहत, किल्ले रायगड चवदार तळे याचा समावेश असल्याने याठिकाणी बंदोबस्त तसेच गुन्हेगारी रोखण्याकरिता पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यासोबतच पुणे रत्नागिरी जिह्याच्या सीमा लगत असल्याने कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे पोलीस यंत्रणेला अधिक सतर्क राहावे लागते. तर पोलादपूर तालुक्यांमध्ये एक नगरपंचायत व ४२ ग्रामपंचायती व सातारा रत्नागिरी जिह्याचा सीमाभाग पोलादपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गावर होणारे अपघात घाट रस्त्यावर घडणारे गुन्हे ,त्यामुळे पोलीस यंत्रणेवर कामाचा अधिक ताण आहे.

याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याकरिता महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांच्याजवळ संपर्क साधला असता पोलिस कर्मचार्यांची रिक्त पदे भरण्याकरिता सरकारकडे पाठपुरावा करणार असून महाड शहरामध्ये पोलिसांकरिता उभारण्यात आलेली निवासस्थाने लवकरच कर्मचाऱ्यांकरिता उपलब्ध व्हावी याकरिता नवीन वसाहतीचा लोकार्पण सोहळा तात्काळ व्हावा अशी मागणी आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे आमदार भरत गोगावले यांनी स्पष्ट केले आहे.