हॉटेल व्यवसाय सुरू करण्याच्या नादात तरूणांनी केलं धक्कादायक कृत्य, आरोपी गजाआड

हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी हे आरोपी लूटमार करत असल्याचं पोलीस तपास स्पष्ट झालं आहे. विपीन ठाकूर, गोपाल सिंह, अभिनंदन शर्मा, मुचन ठाकूर अशी आरोपींची नावे आहेत. २४ तासांमध्ये हे चारही आरोपी गजाआड करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

पनवेल : खारघर गोळीबारातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींच्या अटकेनंतर एक धुक्कादायक खुलासा समोर आला आहे. कोपरा गावातील सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपींपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी हे आरोपी लूटमार करत असल्याचं पोलीस तपास स्पष्ट झालं आहे. विपीन ठाकूर, गोपाल सिंह, अभिनंदन शर्मा, मुचन ठाकूर अशी आरोपींची नावे आहेत. २४ तासांमध्ये हे चारही आरोपी गजाआड करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

नेमकं काय घडलं?

२३ जानेवारीला प्रतीक रवींद्र आहेर २४ वर्षे इस्टेट एजंट रा.पेण शहर जि रायगड हा पेण येथून ३ वाजताच्या दरम्यान वाशी येथे त्याच्या दुचाकीने फिरण्यासाठी आलेला होता. त्यानंतर तो रात्री १० वाजण्याच्या दरम्यान कोपरा गाव बस स्टॉपच्या मागील रोडने आतमध्ये गेला आणि सिगरेट घेऊन तो पीत होता. त्याचवेळी तिथं तीन अनोळखी इसम त्याच्याकडे मोबाईल, पैसे व दुचाकीची चावी मागू लागल्याने ते देण्यास नकार त्याने नकार दिला.

प्रतीकने आपल्याकडील वस्तू देण्यास नकार देताच अनोळखी इसमांपैकी एक जण जबरदस्तीने मोबाईल ओढू लागला. त्याला विरोध केल्याने प्रतीक आहेर याच्या डाव्या पायाच्या मांडीवर शस्त्रातून एक गोळी फायर करून ते तिघेही पळून गेले. जखमीस पायामध्ये गोळी लागल्याने त्या परिसरातून जाणाऱ्या एका इसमाने याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यास पुढील उपचारसाठी एमजीएम कामोठे हॉस्पिटल येथे दाखल केले.