गणपती सणानिमित्त सुतारवाडी नाक्यावरील दुकानं सजली

सुतारवाडी नाक्यावरील विविध प्रकारची दुकाने अनेक शोभिवंत वस्तूंनी मोठ्या प्रमाणावर सजली आहेत. या वर्षी कोरोनाच्या सावटामुळे सर्वत्र मंदीचे सावट असले तरी आपल्या घरी वर्षातून एकदा गणपतीचे आगमन होते. त्यामुळे थोडी फार तरी सजावट केली पाहिजे या उद्देशाने ग्रामीण भागातील ग्रामस्थ आपल्या घरातील सजावटीसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी सुतारवाडी नाक्यावरील रूपेश तवटे यांच्या दुकानांवर विविध प्रकारचे साहित्य खरेदी करताना दिसत आहेत.

सुतारवाडी – गणपती सण अगदी आठवड्यावर येऊन ठेपला असून सुतारवाडी नाक्यावरील विविध प्रकारची दुकाने अनेक शोभिवंत वस्तूंनी मोठ्या प्रमाणावर सजली आहेत. या वर्षी कोरोनाच्या सावटामुळे सर्वत्र मंदीचे सावट असले तरी आपल्या घरी वर्षातून एकदा गणपतीचे आगमन होते. त्यामुळे थोडी फार तरी सजावट केली पाहिजे या उद्देशाने ग्रामीण भागातील ग्रामस्थ आपल्या घरातील सजावटीसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी सुतारवाडी नाक्यावरील रूपेश तवटे यांच्या दुकानांवर विविध प्रकारचे साहित्य खरेदी करताना दिसत आहेत.

घंटी,  धूप,  अगरबत्ती, मंत्र म्यूज़िक, पाठ,  चौरंग विविध प्रकारची हवन सामग्री हार आदी वस्तू खरेदीसाठी ग्राहकांचा मोठा कल आहे. ओवसा करण्यासाठी बाजारामध्ये सुप हीं थोड्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. चिनी बनावटीच्या कोणत्याही वस्तू बाजारात दिसल्या नाहीत असा निर्णय मागेच झाल्यामुळे यावर्षी राखी बंधन आणि गणपती सणांमध्ये कोठेही चिनी बनावटीच्या वस्तू बाजारात दिसल्या नाहीत. गेले चार दिवस नियमितपणे मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे दुकानांवर तुरळकपणे गर्दी दिसत होती.