सुधागड तालुक्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९७ पार

पाली : सुधागड तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी (दि.१८) तालुक्यात ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तालुक्यात पालीत सर्वाधिक २० रुग्ण असल्याने पालिकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.  तालुक्यात आता कोरोनाचे तब्बल ९७ रुग्ण झाले आहे. आणि आत्तापर्यंत कोरोनाचे ६८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर २ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आणि २७ रुग्णावर उपचार सुरू आहेत. अशी माहिती सुधागड-पाली तहसीलदार दिलीप रायन्नावर यांनी दिली आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून खबरदारी घ्यावी असे आवाहन तहसीलदार रायन्नावर यांनी केले आहे.