उल्हास नदीने केलं उग्र रूप धारण, अनेक शहर आणि गावांना पुराच्या पाण्याचा मोठा फटका

कालपासून सुरू असणाऱ्या सतंतधार पावसामुळे उल्हास नदीने उग्र रूप धारण केले आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यातील अनेक शहर व गावांना पुराच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. कर्जत तालुक्यातील धामोते गाव पाण्याने वेढले असून नेरळ कळंब राज्य मार्ग पाण्याखाली गेला आहे. तेच  ५०च्यावर गावांचा संपर्क तुटला आहे. 

    रायगड : मागील तीन दिवसांपासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर आला होता. मुसळधार पाऊस झाल्याने या नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. तसंच उल्हास नदीच्या जवळ असलेले रेल्वेरुळही पाण्याखाली गेले होते.

    परंतु कालपासून सुरू असणाऱ्या सतंतधार पावसामुळे उल्हास नदीने उग्र रूप धारण केले आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यातील अनेक शहर व गावांना पुराच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.

    कर्जत तालुक्यातील धामोते गाव पाण्याने वेढले असून नेरळ कळंब राज्य मार्ग पाण्याखाली गेला आहे. तेच  ५०च्यावर गावांचा संपर्क तुटला आहे.

    कर्जत गावात झालेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर आला असून येथील गावांना पुराचा फटका बसला आहे. तसेच काही घरे पाण्याखाली गेलेली दिसत आहेत. तसेच नदीतील पाणी वाऱ्याच्या झोतासोबतच खळखळ वाहत आहे.