कोलाड चक्रीवादळाचा व्हिडिओ केवळ अफवाच – सरपंच सुरेश महाबळे

सुतारवाडी - दिनांक २ जून रोजी कोलाड येथे चक्रीवादळाचा जो व्हिडिओ व्हायरल झाला. ती केवळ अफवाच होती. मात्र १ जून रोजी दमदार पाऊस आणि मोठ्या प्रमाणावर वादळी वारा झाला होता. त्यावेळी जनजीवन विस्कळीत झाले

सुतारवाडी – दिनांक २ जून रोजी कोलाड येथे चक्रीवादळाचा जो व्हिडिओ व्हायरल झाला. ती केवळ अफवाच होती. मात्र १ जून रोजी दमदार पाऊस आणि मोठ्या प्रमाणावर वादळी वारा झाला होता. त्यावेळी जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले,  काही ठिकाणी झाडे ही उन्मळून पडली होती अशी माहिती आंबेवाडी ग्रामपंचायत सरपंच सुरेशदादा महाबळे यांनी सांगितली.

मात्र काल जो व्हिडिओ व्हायरल केला गेला होता तो दिनांक १ जून २०२० रोजी चा होता. ही केवळ अफवाच होती. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका. या व्हिडीओची कोणत्याही प्रकारची चौकशी न करता काही चॅनलवर सुद्धा दाखविण्यात आले. त्यावर कोणीही विश्वास ठेवू नका असेही सुरेश महाबळे यांनी सांगितले.