‘तो’ विषय गांभीर्याने घेण्याची गरज नाही, विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं असं काही…

नाना पटोले यांनी कुणावरही टीका केलेली नाही. ते पक्षवाढीचं काम करताहेत त्‍यासाठी हायकमांडने त्‍यांना पाठवलं आहे. शब्‍दाच्‍या अर्थाचा अनर्थ करून महाविकास आघाडीत अस्थिरता आहे हे दाखवायचं हा नवा धंदाच विरोधी पक्षांनी सुरू केलेला आहे. असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

    अलिबाग: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचं जाहीर केलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी निवडणुकांना अजून तीनस साडेतीन वर्षे बाकी आहेत. त्यामुळे हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असं सांगितलं. त्यामुळे स्वबळाच्या मुद्द्यावरून काँग्रेसमध्येच एकवाक्यता नसल्याचं दिसून आलं आहे. विजय वडेट्टीवार आज अलिबागमध्ये होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

    नाना पटोले यांनी कुणावरही टीका केलेली नाही. ते पक्षवाढीचं काम करताहेत त्‍यासाठी हायकमांडने त्‍यांना पाठवलं आहे. शब्‍दाच्‍या अर्थाचा अनर्थ करून महाविकास आघाडीत अस्थिरता आहे हे दाखवायचं हा नवा धंदाच विरोधी पक्षांनी सुरू केलेला आहे. असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

    पुढे म्हणाले की, तिन्ही पक्षांमध्‍ये उत्‍तम समन्‍वय आहे. पाच वर्षे हे सरकार टिकणार आहे. कितीही आरोप केले, सरकारला बदनाम केलं तरी सरकारला काहीच धोका नाही. आज जाईल, उद्या जाईल म्‍हणता म्‍हणता या सरकारने दीड वर्ष पूर्ण केली आहेत. पुढची साडेतीन वर्षेही पूर्ण होतील, असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.