raped boy

पीडित मुलगा नऊ वर्षांचा असून( year old boy raped) तो देवळी ( ता. माणगाव ) येथे राहतो. आपली आई आणि दोन भावांसह तो चिंभावे येथे आईच्या माहेरी आला होता. १७ मार्च रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास तो आपल्या भावांसह अंगणात खेळत होता.

    महाड: एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या विकृत नराधमाविरुद्ध महाड(mahad) तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल(crime in mahad) करण्यात आला आहे. ही घटना १७ मार्च रोजी चिंभावे गावात घडली.

    पीडित मुलगा नऊ वर्षांचा असून तो देवळी ( ता. माणगाव ) येथे राहतो. आपली आई आणि दोन भावांसह तो चिंभावे येथे आजोळी आला होता. १७ मार्च रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास तो आपल्या भावांसह अंगणात खेळत होता. त्याच वेळेस अमिर अली नेकवारे (वय ३२,रा. चिंभावे मोहोल्ला ) याची नजर त्याच्यावर पडली. नेकवारे याने त्याला स्वतःच्या घरात बोलावून घेतले आणि त्याच्यावर पाशवी लैंगिक अत्याचार केले.

    हा प्रकार या मुलाने आपल्या आईला सांगितल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी तिने नेकवारे याच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अमिर अली नेकवारे याच्या विरुद्ध पोलिसांनी भादंवि कलम ३७७ आणि बाल लैगिक अत्याचार संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,५ (एम ) आणि ८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस निरिक्षक एन.एम. कुचेकर हे अधिक तपास करित आहेत.