पेण एसटी आगारातील तीन कर्मचारी निलंबित

त्रैमासिक पासमध्ये अफरातफर केल्याने कारवाई

पेण : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या रायगड जिल्ह्यातील पेण आगारातील जे.जी.पाटील,आर.बी.पाटील,जे जे.देशपांडे असे हे तीन कर्मचारी वर्ग असून यांचे निलंबन करण्यात आले आहे. अशी माहिती विभाग नियंत्रक यांनी दिली आहे. देण्यात येणाऱ्या त्रैमासिक पासच्या रकमेची अफरातफर व १५ फाईल गहाळ केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ज्या प्रवासांनी त्रैमासिक पास काढले होते त्या प्रवाशांना लॉकडाउन काळात एसटी महामंडळाकडून सेवा देण्यात आली नसल्याने त्याचा परतावा प्रवाशांना देण्यात येणार असल्याचे आवाहन केल्यानंतर जे प्रवासी आपले पासचे पैसे घेण्यासाठी आले तेव्हा एसटी महामंडळाच्या बुकमध्ये नोंदच नसल्याचा प्रकार उघडकीस आला आणि त्यानंतर चौकशी केली असता पेण आगारातील पास काढण्याचे अनेक बुक गहाळ झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे त्यावेळी सेवेत असणाऱ्या पेण आगारातील तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे आणि येत्या ३ ते ४ दिवसात त्यांच्यावर फौजदारी गुन्हा देखील दाखल करण्यात येणार