पनवेल तालुका पोलीस ठाण्यातील ३ योद्ध्यांची कोरोनावर मात

पनवेल : पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे ३ योद्धे कोरोनावर मात करून सुखरूप घरी परतले. या योद्ध्यांचे पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व

 पनवेल : पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे ३ योद्धे कोरोनावर मात करून सुखरूप घरी परतले. या योद्ध्यांचे पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी वर्गाने त्यांच्या घराच्या प्रांगणात जाऊन पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.

पनवेल तालुका पोलीस ठाण्यातील ४ कर्मचाऱ्यांना या महिन्यात कोरोना विषाणूची लागण झाल्याने त्यांना नवी मुंबई येथील डि.वाय. पाटील रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी पूर्ण उपचार घेऊन ते आता घरी परतण्यास सुरुवात झाली आहे. त्यातील तीन योद्धे घरी परतले.यावेळी पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी त्याच्या घराच्या प्रांगणात जाऊन उपचार घेऊन सुखरूप परतल्याबद्दल त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्याचा निर्णय घेतला. कामोठे सेक्टर- ८ मधील एक योद्धा त्याच्या घरी पोहोचल्यावर तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी वर्गाने पुष्पवृष्टी करून त्याचे स्वागत करून लवकरच पुन्हा कर्तव्य बजाविण्यासाठी आमच्यात सामील हो, असे आवाहनही केले.