kemburli accident

महाड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड(mahad) शहरानजीक असणाऱ्या केंबुर्ली(kemburli) गावच्या हद्दीत आज दुपारी १२.३० वाजता महाडकडून मुंबई दिशेकडे जाणाऱ्या अर्टिका गाडीने टेम्पोला ओव्हरटेक करताना मुंबई दिशेकडून महाडकडे येणाऱ्या टेम्पोला दिलेल्या ठोकरीमध्ये अर्टिका गाडीचा चालक जखमी झाला असून सुदैवाने मोठा अपघात टळला आहे.

महाड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड(mahad) शहरानजीक असणाऱ्या केंबुर्ली(kemburli) गावच्या हद्दीत आज दुपारी १२.३० वाजता महाडकडून मुंबई दिशेकडे जाणाऱ्या अर्टिका गाडीने टेम्पोला ओव्हरटेक करताना मुंबई दिशेकडून महाडकडे येणाऱ्या टेम्पोला दिलेल्या ठोकरीमध्ये अर्टिका गाडीचा चालक जखमी झाला असून सुदैवाने मोठा अपघात टळला आहे.(accident on mumbai goa highway)

आज दुपारी साडेबाराच्या सुमारास महाड दिशेकडून मुंबईला जाणाऱ्या अर्टिका गाडी क्रमांक एम.एच.०२ डि.एन.४२७७ ने टेम्पो क्रमांक एम.एच ०२ एफ.जी.०३६५ ला ओव्हरटेक करताना समोरून मुंबईकडून येणारा टेम्पो क्र. एम.एच.०६ बि डि ३३५०जागेवरच पलटी झाला. अर्टिका गाडी उलटी फिरून पाठीमागून येणाऱ्या टेम्पोवर जोरात आदळल्याने झालेल्या अपघातात अर्टिका चालक संतोष जांगली  जखमी झाला आहे .

सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताची नोंद करण्याचे काम महाड शहर पोलीस ठाण्यात सुरु होते. घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार ही ठोकर भीषण होती. सुदैवाने अर्टिका गाडीमध्ये अन्य प्रवासी नसल्याने मोठा अपघात टळल्याचे सांगण्यात येत आहे.