Tourist drowns in Nagaon sea at alibaug

यंदाही सतीश गोलतकर त्याच्या चार-पाच मित्रांसह येथे आला होता. काल (१३ डिसेंबर) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ते नागाव समुद्रकिनार्‍यावर आले. मात्र सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सतीश ग्रुपमध्ये आढळून न आल्याने त्याच्या मित्रांनी शोधाशोध सुरु केली.

अलिबाग : तालुक्यातील नागाव येथील समुद्रात बुडून एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळी घडली. सतीश गोलतकर (वय ३५) असे या मृत तरुणाचे नाव आहे.

सतीश हा त्याच्या अन्य मित्रांसह घाटकोपर येथून नागाव येथील समुद्र किनार्‍यावर फिरायला आला होता. दरवर्षी त्यांचा ग्रुप पर्यटनासाठी येथे येत असतो. यंदाही सतीश गोलतकर त्याच्या चार-पाच मित्रांसह येथे आला होता. काल (१३ डिसेंबर) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ते नागाव समुद्रकिनार्‍यावर आले. मात्र सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सतीश ग्रुपमध्ये आढळून न आल्याने त्याच्या मित्रांनी शोधाशोध सुरु केली.

सायंकाळी तो मृतावस्थेत आढळून आला. सतीश गोलतकर याचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. या घटनेने त्याच्या मित्रांना धक्का बसला आहे. दरम्यान, सतीशचा मृतदेह अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला असून, अलिबाग पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.