कशेडी घाटात चाकरमान्यांच्या वाहनांची वाहतूक कोंडी, २ ते ३ कीमीच्या रांगा

  • चाकरमानी गावागावात मार्गस्त 
  • चाकरमानी ७ ऑगस्ट पर्यत दाखल होणे गरजेचे असल्याने अनेक चाकरमानी गावागावात दाखल होत आहे नारळी पौर्णिमा रक्षा बंधन ३ रोजी असल्याने अनेक चाकरमानी यांनी गावाकडे घाव घेतली आहे आज सुमारे दोन ते तीन किलोमीटर इतकी रांग लागल्याचे पहावयास मिळते.

पोलादपूर : कोकणातील सर्वात महत्वपूर्ण असा गणेशोत्सव २२ ऑगस्ट रोजी सुरु होणार आहे. या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून कोकणात येण्यासाठी चाकरमान्यांनी आतापासूनच धाव घेतल्याचे दिसून येत आहे. आज मुंबईहून कोकणात येण्यासाठी मुंबई- गोवा महामार्गावरील कशेडी घाटात चाकरमान्यांच्या गाड्यांची रांग लागलेली असून यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली आहे 

मुंबई गोवा महामार्गावर गणेशोत्सव हजारो चाकरमानी गावागावात दाखल होत असतात या वर्षी चाकरमानी याना गावात येताना १४ दिवस क्वांरटाईन व्हावे लागणार आहे या साठी अनेक चाकरमानी ७ ऑगस्ट पर्यत दाखल होणे गरजेचे असल्याने अनेक चाकरमानी गावागावात दाखल होत आहे नारळी पौर्णिमा रक्षा बंधन ३ रोजी असल्याने अनेक चाकरमानी यांनी गावाकडे घाव घेतली आहे आज सुमारे  दोन ते तीन किलोमीटर इतकी रांग लागल्याचे पहावयास मिळते.

या रांगेतच अवजड वाहने असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. चाकरमानी ७ तारखेपर्यंत कोकणात आले तरच २२ तारखेला क्वारंटाईन होऊन बाहेर पडू शकतात, या गणितामुळे आतापासूनच चाकरमान्यांनी कोकणाकडे धाव घेतली आहे. या काळात वाहतूक ठप्प होऊ नये म्हणून अवजड वाहतूक बंद करावी अशी मागणी देखील होत आहे.शासनाने अध्याप चाकरमानी याच्या साठी एसटी कोकण रेल्वे याची सोय केली नसल्याने व भविष्यात केल्यास ५० टक्के आसन नियमावली केल्यास गर्दी होण्याची शक्यता आहे शासनाच्या १४ दिवसाच्या नियमावली चा फटका सर्व सामान्य नागरिकांना नोकरवर्गाला बसला आहे 

आज इतर राज्यातील नागरिक मोठ्या प्रमाणावर मुंबईत पुणे सह इतर शहरात दाखल होत आहे त्यांना १४ दिवस क्वांरटाईन ची नियमावली नसल्याने कोकणातील चाकरमानी यांना ही सक्ती का असा सवाल प्रवासी विचारात आहे 

कोकणात देवगड तालुक्यातील दहिबाव या गावी जात आहे १४ दिवसाच्या कोरोनटाईनच्या मूर्खपणाच्या निर्णयामुळे मला प्रचंड त्रास होत आहे. मला कोणत्याही प्रकारे कोरोना लक्षणे नसताना किंवा मुळात मला हा आजार नसताना केवळ शासनाकडे वैद्यकिय यंत्रणा आणि उपाययोजना नसल्याने मी एका खोलीत स्वतःला कोंडून घेवून का १४ दिवस त्रास सहन करायचा आणि १४ दिवसांनी मला काहीच झाले नाही मग काय ? मला असे काहीच प्रॉब्लेम नसताना केवळ सरकारी यंत्रणा मुर्ख असल्यामुळे त्यांच्याकडे चेकअपची यंत्रणाच नसल्यामुळे मी विनाकारण का त्रास आणि अत्याचार सहन करायचा का?, असा सवाल विपुल परब या प्रवासी नी व्यक्त केला आहे