Traffic on the well known historic Janjira fort starts from today
आजपासून सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावरील वाहतूक सुरु

प्रदीर्घ काळ बंद असलेल्या सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावरील जल वाहतूक आज पासून सुरू करण्यात आली आहे.१३ शिडांच्या बोटी व दोन यांत्रिकी नौकांच्या सहाय्याने येथील वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.

मुरुड जंजिरा : मुरुड तालुक्यातील राजपुरी येथे सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ला असून तो पहाण्यासाठी वर्षाला पाच लाखांपेक्षा जास्त लोक या ठिकाणी भेट देत असतात समुद्रामध्ये असणारा किल्ला व चहू बाजूला खारट पाणी असताना देखील दोन गोड्या पाण्याचे तलाव तसेच २२ एकर किल्ल्याचा परिसर व २२ बुरुज असलेला किल्ला सर्वांना नेहमीच आकर्षित करत आला आहे.

प्रदीर्घ काळ बंद असलेल्या सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावरील जल वाहतूक आज पासून सुरू करण्यात आली आहे.१३ शिडांच्या बोटी व दोन यांत्रिकी नौकांच्या सहाय्याने येथील वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. राजपुरी नवीन जेट्टी,खोरा बंदर व दिघी येथून जंजिरा किल्ल्यावरील वाहतूक व्यवस्था केली जाते. रायगड जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊन सुद्धा महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाने जल वाहतूक सुरु न केल्यामुळे सदरचा किल्ला बंद ठेवण्यात आला होता.परवाने नूतनीकरण व प्रवाशी विमा न केल्यामुळे बोर्डाने जल वाहतूक सुरु केली नव्हती परंतु आता सर्व जल वाहतूक सोसायटीने या सर्व बाबीची पूर्तता केल्यामुळे आज पासून जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.

मार्च महिन्यापासून सदरचा किल्ला संचार बंदी काळात बंद करण्यात आला तो अद्यापपर्यंत पर्यटकांसाठी खुला करण्यात आलेला नव्हता, त्यामुळे या किल्ल्यावर उपजीविका अवलंबून असलेले सुमारे २५० लोकांचे संसार धोक्यात आले आहेत. जंजिरा किल्ल्यात जाण्यासाठी शिडाच्या बोटीने पर्यटकांना किल्ल्यापर्यंत पोहचवले जाते यासाठी प्रत्येक शिडाच्या बोटीवर चार ते पाच लोक काम करीत असतात अशा शिडाच्या बोटी २० पेक्षा जास्त असून या बोटी वर काम करणारे मजूर सध्या उपाशीपोटी असून त्यांच्या रोजगाराचा गहन प्रश्न निर्माण झाला होता.

आता किल्ला सुरु झाल्याने पुन्हा या लोकांना रोजगार प्राप्त झाला असून हा परिसर सध्या गजबजून गेला आहे. आज पहिल्याच दिवशी पर्यटकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. आपल्या चार चाकी गाड्यसह पर्यटकांचे आगमन झाले होते. बोटधारक व याठिकाणी छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

जल वाहतुकीस मेरीटाईम बोर्डाने परवानगी दिली आहे.कोविडच्या पार्शभूमीवर मास्क लावणे,शारीरिक अंतर राखणे व हात सवच धुणे या त्रिसूत्रीचा अवलंब प्रवाशी यांच्यसह बोट धारकांनी करावा. त्याच प्रमाणे लवकरच किल्ल्याच्या साफसफाईला मजूर घेऊन सुरुवात करणार आहोत.

बी.जी.येलीकर सहाय्य्क संवर्धक पुरातत्व खाते मुरुड जंजिरा