पनवेल महापालिका प्रभाग अधिकार्‍यांच्या बदल्या,  २ अधिकाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार

पनवेल : पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी शनिवारी (दि. ३० मे) रात्री प्रभाग अधिकार्‍यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करून त्वरित पदभार स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत

 पनवेल : पनवेल महापालिकेचे  आयुक्त सुधाकर देशमुख यांनी शनिवारी (दि. ३० मे)  रात्री प्रभाग अधिकार्‍यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करून त्वरित पदभार स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत . जाहिरात परवाना विभागाचे अधिकारी सदाशिव कवटे आणि नाट्यगृहाचे व्यवस्थापक अरूण कोळी यांचेकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. 

पनवेल महापालिकेत प्रभाग  ‘अ’ खारघर , प्रभाग ‘ब’ कळंबोली , प्रभाग ‘क’ कामोठे आणि प्रभाग ‘ड’ पनवेल असे चार प्रभाग असून शनिवारी रात्री आयुक्त सुधाकर देशमुख यांनी  प्रभाग ‘ड’ चे दशरथ भंडारी यांची बदली प्रभाग ‘अ’ मध्ये केली आहे. नाटयगृहाचे व्यवस्थापक अरुण कोळी यांची बदली प्रभाग  ‘क’ चे प्रभाग अधिकारी म्हणून  केली आहे.  जाहिरात विभागाचे सदाशिव कवठे यांची प्रभाग ‘ड’ चे अधिकारीपदी , प्रभाग ‘क’ चे सुरेश गांगरे यांची पाणी कर संकलन अधिकारी म्हणून आणि  प्रभाग  ‘ब’ चे  प्रकाश गायकवाड यांना त्यांच्या मूळ जागीच ठेवण्यात आले आहे.  

जाहिरात परवाना  विभागाचे अधिकारी सदाशिव कवटे आणि नाट्यगृहाचे व्यवस्थापक अरूण कोळी यांना प्रभाग अधिकारी पदाचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे. बदली नाकारली किवा राजकीय दबाव आणल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याची तंबी देखील देण्यात आली आहे .