पाली वाकण राज्य महामार्गावर अंबा नदी पुलाजवळ झाड कोसळले, वाहतूक ठप्प

पाली: निसर्ग चक्रीवादळामुळे पाली वाकण राज्य महामार्गावर अंबा नदी पुलाजवळ आज रस्त्यावर झाड कोसळले. त्यामुळे येथील वाहतूक ठप्प झाली.प्रशासनाने ताबडतोब दखल घेत या मार्गावरून कोणीही न जाण्याच्या

पाली: निसर्ग चक्रीवादळामुळे पाली वाकण राज्य महामार्गावर अंबा नदी पुलाजवळ आज रस्त्यावर झाड कोसळले. त्यामुळे येथील वाहतूक ठप्प झाली. प्रशासनाने ताबडतोब दखल घेत या मार्गावरून कोणीही न जाण्याच्या सूचना दिल्या. हे झाड रस्त्यावर आडवे पडले असल्याने बहुतांश रस्ता व्यापला गेला होता. सोसाट्याचा वारा व पाऊस यामुळे झाड बाजूला करणे किंवा काढणे लगेच शक्य झाले नाही. या पडलेल्या झाडामुळे येथील वाहतूक मात्र ठप्प झाली होती.