मुलभूत सुविधांच्या मागण्यांसाठी ९ ऑगस्टला आदिवासी बांधवांचे उपोषण

  • मुलभूत सुविधांच्या मागण्यांसाठी आदिवासी बांधव उपोषणावर ठाम असून पनवेल प्रांत कार्यालयासमोर ९ ऑगस्ट आदिवासी दिन साधून उपोषणाला बसणार आहेत. आपटा ग्रामपंचायत हद्दीमधील कोरलवाडी आदिवासी वाडीत स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा रस्ता नाही. तसेच या वाडीची लोकसंख्या सुमारे १४५ एवढी असून कुटुंब संख्या ४७ एवढी आहे.

 पेण – आदिवासी विकास विभागाने घेतलेल्या बैठकी नंतरही महसूल विभागाच्या हलगर्जीपणाचा निषेध करीत मुलभूत सुविधांच्या मागण्यांसाठी आदिवासी बांधव उपोषणावर ठाम असून पनवेल प्रांत कार्यालयासमोर ९ ऑगस्ट आदिवासी दिन साधून उपोषणाला बसणार आहेत. आपटा ग्रामपंचायत हद्दीमधील कोरलवाडी आदिवासी वाडीत स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा रस्ता नाही. तसेच या वाडीची लोकसंख्या सुमारे १४५ एवढी असून कुटुंब संख्या ४७ एवढी आहे. वाडीला तारा गावाजवळून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग या मुख्य रस्त्याला जोडावे अशी मागणी आहे.

कोरलवाडी ते तारागाव( मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गापर्यंत)चे अंतर अंदाजे ३ किलोमीटर एवढे होईल. हा रस्ता बनवयाचा झाला तर या रस्त्यामध्ये साधारण वनविभागाची ३० टक्के तर खाजगी ७० टक्के जागा संपादित करावी लागेल  ह्याबाबत वन विभागाने प्रस्ताव आल्यास वनविभागाकडून परवानगी देण्यात येईल असे सांगितले. आहे. मात्र रायगड जिल्हा परिषद व इतर संबंधित विभागाकडून कारवाई होणे अपेक्षित असताना महसूल विभाग व आदिवासी विकास प्रकल्प याकडे   सपशेल दुर्लक्ष करीत आहेत. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनाही  प्रत्यक्ष भेटून लेखी पत्र व्यवहार केला तेंव्हा सदर प्रश्न मार्गी लागेल असे आश्वासनही  दिली.

परंतु त्यांच्याकडूनही निराशाच झाली असल्याचे मत ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष समाजसेवक संतोष ठाकूर यांनी व्यक्त केले तसेच ज्या आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱयांनी हा प्रश्न सोडविणे अपेक्षित होता त्यांनीही आजपर्यंत लक्ष दिले नसल्याचेही संतोष ठाकूर यांनी सांगितले त्यामुळे दि. ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनापासून ग्राम संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कोरलवाडीतील संतप्त आदिवासी बांधव पनवेल प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसत आहेत.

या संदर्भातील बातम्यांचा आधार घेऊन गुरुवार ६ ऑगस्ट रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभाग रायगड पेणच्या प्रकल्प अधिकारी संतोष ठाकूर आणि कोरलवाडी ग्रामस्थांसोबत बैठक घेतली. या बैठकीत सर्व मागण्यांवर चर्चा झाली परंतु संबंधित महसूल विभाग  म्हणजे पनवेल प्रांत कार्यालयाकडून समस्यांबाबत कारवाई करण्यासंबंधी ग्रामसंवर्धनला किंवा कोरलवाडी ग्रामस्थांना साधे पत्र देखील देण्यात आलेले नाही. त्यामुळे आम्ही सर्व ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनापासून बेमुदत उपोषणाच्या निर्णयाला ठाम राहण्याचा निर्णय संतोष ठाकूर यांच्यासह कोरलवाडी  ग्रामस्थांनी घेतला आहे.