रायगडमधील कुडपणजवळ वऱ्हाडाचा ट्रक ३०० फूट दरीत कोसळला, दोघांचा मृत्यू – बचावकार्य सुरु

रायगडमध्ये भीषण अपघात झाला(accident in raigad) असून वऱ्हाडाचा ट्रक ३०० फूट दरीत कोसळला आहे. पोलादपूर तालुक्यातील कुडपण धनगरवाडी जवळील वळणावर झाला वऱ्हाडाच्या ट्रकला(kudpan truck accident) अपघात झाला आहे.

पोलादपूर: रायगडमध्ये भीषण अपघात झाला(accident in raigad) असून वऱ्हाडाचा ट्रक ३०० फूट दरीत कोसळला आहे. पोलादपूर तालुक्यातील कुडपण धनगरवाडी जवळील वळणावर झाला वऱ्हाडाच्या ट्रकला(kudpan truck accident) अपघात झाला आहे. हा ट्रक रत्नागिरी येथून पोलादपूरला जात होता. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून रेस्क्यू ऑपरेशन सुरु झाले आहे. घटनास्थळी दोन मृतदेह सापडले असून २० ते २२ लोक जखमी झाल्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या ट्रकमध्ये जवळपास २५ लोक प्रवास करत होते. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि ट्रेकर्स दाखल झाले आहेत. बचावकार्य सुरु आहे. अंधार असल्याने बचावकार्यामध्ये अडथळा येत आहे. जखमींना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी घटनास्थळी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं आहे. तसंच रक्ताची गरज भासेल यासाठी ब्लड बँकेलाही सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.