मुंबई -गोवा महामार्गावर ट्रकने घेतला पेट

पनवेल : मुंबई -गोवा महामार्गावर कर्नाळा खिंड सोडल्यावर उतारावर पेण बाजूकडून पनवेल बाजूकडे येत असलेल्या मालाने भरलेल्या ट्रकने पेट घेतल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या मध्ये सुदैवाने कोणतीही जीवित

पनवेल : मुंबई -गोवा महामार्गावर कर्नाळा खिंड सोडल्यावर उतारावर पेण बाजूकडून पनवेल बाजूकडे येत असलेल्या मालाने भरलेल्या ट्रकने पेट घेतल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या मध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे समजते . मुंबई -गोवा महामार्गावर पनवेल तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत कर्नाळा खिंड सोडल्यावर पनवेल बाजूच्या  उतारावर हॉटेल क्षणभर विश्रांती  जवळ पेण बाजूकडून पनवेल बाजूकडे येत असलेल्या  ट्रकने आज सकाळी १०.३० च्या सुमारास अचानक पेट घेतला. या ट्रकमध्ये कोळसा असल्याचे समजते. त्यामुळे वार्‍याने आग लगेच भडकली. आगीच्या ज्वाळा दिसताच स्थानिकांनी पळस्पे वाहतूक पोलीस शाखा, तालुका पोलीस ठाणे व अग्नीशमन दलाकडे संपर्क साधला. पळस्पे वाहतूक पोलीस शाखा आणि अग्नीशमन दलाने तातडीने घटनास्थळी  येऊन आग विझवली. या आगीचे कारण अद्याप समजलेले नाही. आगीत ट्रकचे मोठे नुकसान झाले असून कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.