इमारतीच्या ढिगाऱ्याखालून १२ जणांना बाहेर काढण्यात यश, चार जणांचा मृत्यू

ढिगाऱ्याखालून १२ व्यक्तींना बाहेर काढण्यात यश आले आहे त्यापैकी चार व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तर आठ व्यक्तींना उपचाराकरता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यापैकी पाच व्यक्तींना उपचार करून घरी सोडण्यात आले.

महाड : सोमवारी सांयकाळी महाड शहरातील काजळपूरा खारखांड मोहल्ला येथील तारीक गार्डन ही पाच मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ४१ फ्लॅटमधील ९७ रहिवाशांपैकी ७८ रहिवाशी सुखरूप बाहेर पडले तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या १९ पैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे तब्बल १९ तासांनंतर ४ वर्षाच्या बालकाला मलब्यातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. दुर्घटनेचं एकंदर स्वरुप पाहता घटनास्थळी तातडीनं बचावकार्यास सुरुवात करण्यात आली. या दुर्घटनेप्रकरणी इमारतीच्या दोन्ही बिल्डरच्या नावे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून १२ व्यक्तींना बाहेर काढण्यात यश आले आहे त्यापैकी चार व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तर आठ व्यक्तींना उपचाराकरता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यापैकी पाच व्यक्तींना उपचार करून घरी सोडण्यात आले. तसेच अद्याप १५ व्यक्ती ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.