मुंबई-गोवा हायवे मार्गावर भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू

सुतारवाडी : दि. १ ऑगस्ट रोजी कोलाड गावाच्या हद्दीमध्ये मुंबई-गोवा हायवे रस्त्यावर प्रतीक्षा हॉटेल समोरील कोकण रेल्वे ब्रिजजवळ सायंकाळी ४.१५ वाजता अपघात घडला. याबाबत कोलाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माणगाव येथून मुंबईकडे मोटरसायकल घेऊन जाणारा मोटारसायकल क्रमांक एम एच ०६ बी एक्स ०५१३ रसिक रामभूज निसाद वय १७ वर्ष याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अतिवेगाने मोटारसायकल चालविली. समोरून येणारा टँकर क्रमांक एम एच ४३ वाय ४३४५ ला ओव्हरटेक करून पुढे जात असताना अपघात झाला.

या अपघातामध्ये मोटरसायकल पाठीमागे बसलेला अक्षय विठ्ठल मरचंडे वय वर्षे २३ रा. माणगाव व रोशन रमेश शिंदे वय वर्षे २३ रा. तिसे बौद्धवाडी तालुका रोहा हे जागीच ठार झाले. याबाबत कोलाड ठाण्यामध्ये भा.द.वि कलम ३०४ अ,  २७९, ३३७, ३३८, १८४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री प्रशांत तायडे,  तसेच एन.आर पाटील अधिक तपास करत आहेत.