पनवेल शहरात वेल्डींग मशीन फुटून २ कामगार जखमी

पनवेल : पनवेल शहरातील सोसायटीत पत्र्यांचे आणि पाइप लावण्याचे काम गच्चीत करीत असताना वेल्डींग मशीन फुटून २ कामगार जखमी झाले. तात्काळ मदत मिळाल्याने कामगारांचा जीव वाचला.पनवेलमधील जुन्या पोस्ट

पनवेल : पनवेल शहरातील सोसायटीत पत्र्यांचे आणि पाइप लावण्याचे काम गच्चीत करीत असताना वेल्डींग मशीन फुटून २ कामगार जखमी झाले. तात्काळ मदत मिळाल्याने कामगारांचा जीव वाचला. पनवेलमधील जुन्या पोस्ट ऑफिस जवळील जनार्दन सहनिवास या सोसायटीमध्ये पावसाळयात पाणी गळू नये म्हणून पत्रे आणि पाईप लावण्याचे काम शफिक हैदर आणि त्याचा सहकारी वेल्डिंगचे काम करत असताना ते मशीन जोरात फुटले. त्यामुळे शफिक हैदरचे अंग पूर्णपणे भाजले आणि  तो तसाच गच्चीवर पडला. त्याच्यासोबत असलेला सहकारीही जखमी झाला. या घटनेची माहिती सोसायटीमध्ये राहणाऱ्या सभासदांनी लगेच मंदार काणे , सुशांत मोहिते यांना देऊन तात्काळ अॅम्ब्युलन्स मागवून घेतली. जखमींना गच्चीवरून खाली आणून कळंबोली येथील एमजीएम या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले.  या कामगारांवर एमजीएममध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच त्या प्रभागातील नगरसेविका रुचिता लोंढे यांनी त्या ठिकाणी येऊन जखमी कामगारांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास मदत केली. त्यांना तत्काळ वैद्यकीय मदत मिळाल्याने त्यांच्या जीवाचा धोका टळला आहे