काका पुतण्याने रचला इतिहास, पनवेलमध्ये पिकवली स्ट्रॉबेरी, कमावला एवढा पैसा

सज्जन पवार आणि त्यांचा पुतण्या प्रशांत पवार यांनी पनवेल तालुक्यातील वावंजे गावात स्ट्रॉबेरीची शेती करण्याचा निर्णय घेतला. हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात त्यांनी स्ट्रॉबेरीची १ हजार रोपं लावली. यासाठी त्यांना १५ हजार रुपये खर्च आला. सध्या त्यांच्या स्ट्रॉबेरी ३०० रुपये किलो या दराने विकल्या जात असून आतापर्यंत त्यांनी ४५ हजार रुपये कमावले आहेत. म्हणजेच उत्पादन खर्चाच्या तिप्पट उत्पन्न त्यांना आताच मिळाले आहे. 

    स्ट्रॉबेरी हे खऱं तर थंड हवेत येणारं पीक. मात्र पनवेलमधील काका पुतण्याच्या एका जोडीनं अनोखा प्रयोग करत हे पीक पनवेल तालुक्यात घेतलं आणि त्यांना त्यात अभूतपूर्व यश मिळालं.

    सज्जन पवार आणि त्यांचा पुतण्या प्रशांत पवार यांनी पनवेल तालुक्यातील वावंजे गावात स्ट्रॉबेरीची शेती करण्याचा निर्णय घेतला. हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात त्यांनी स्ट्रॉबेरीची १ हजार रोपं लावली. यासाठी त्यांना १५ हजार रुपये खर्च आला. सध्या त्यांच्या स्ट्रॉबेरी ३०० रुपये किलो या दराने विकल्या जात असून आतापर्यंत त्यांनी ४५ हजार रुपये कमावले आहेत. म्हणजेच उत्पादन खर्चाच्या तिप्पट उत्पन्न त्यांना आताच मिळाले आहे.

    काही महिन्यांपूर्वी या काका पुतण्यानं एका कृषी संमेलनाला हजेरी लावली होती. त्यात त्यांना महाडमधील एका शेतकऱ्यानं स्ट्रॉबेरीचा प्रयोग केल्याची माहिती मिळाली. त्यापासून प्रेरणा घेत त्यांनी आपल्याही शेतात स्ट्रॉबेरीची लागवड करण्याचा निर्णय़ घेतला. महाड हे पनवेलपासून १३० किलोमीटर अंतरावर असून दमट हवा असलेलं कोकणातील ठिकाण आहे.

    जर महाडमध्ये हा प्रयोग यशस्वी होऊ शकतो, तर पनवेलमध्ये का नाही, असा विचार करत या दोघांनी स्ट्रॉबेरी पिकाची लागवड केली. पाहता पाहता हा प्रयोग यशस्वी झाला आणि काही महिन्यांतच त्यांना उत्पादन खर्चाच्या तिप्पट रक्कम स्ट्रॉबेरीच्या विक्रीतून मिळाली. अजूनही स्ट्रॉबेरीची विक्री सुरू असून त्यांचा फायदा वाढण्याची शक्यता आहे.

    सध्या त्यांनी सेंद्रीय पद्धतीने स्ट्रॉबेरीची लागवड केली असल्यामुळे स्ट्रॉबेरीसाठी मोठी मागणी त्यांना येतेय. मागणीएवढा पुरवठा करणे सध्या शक्य नसून लवकरच मोठ्या क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड करण्याचा निर्धार त्यांनी केलाय.