बोरघर येथे साखर चौथ गणेश चतुर्थी निमित्त अनोखा स्तुत्य उपक्रम

अनंत चतुर्थीचे गणपती विसर्जन झाल्यानंतर येणारी पहिल्याच संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने बोरघर येथे संपन्न करण्यात आलेल्या साखरचौथ गणेशोत्सवामध्ये रक्तदान शिबिराचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड,पेण, पनवेल, उरण, अलिबाग, रोहा, माणगाव, महाड आदी सर्वच तालुक्यातील गावो गावी सार्वाजिक तसेच घरगुती पद्धतीने साखर चौथ गणपती बाप्पांचे आगमन होते.

रोहा: रोहे तालुक्यातील श्री काळभैरव क्रिडा मित्र मंडळ, ग्रामस्थ मंडळ बोरघर यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित भाद्रपद महिन्यातील दहा दिवसांचे अनंत चतुर्थीचे गणपती विसर्जन झाल्यानंतर येणारी पहिल्याच संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने बोरघर येथे संपन्न करण्यात आलेल्या साखरचौथ गणेशोत्सवामध्ये रक्तदान शिबिराचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड,पेण, पनवेल, उरण, अलिबाग, रोहा, माणगाव, महाड आदी सर्वच तालुक्यातील गावो गावी सार्वाजिक तसेच घरगुती पद्धतीने साखर चौथ गणपती बाप्पांचे आगमन होते.

साखर चौथ गणेश चतुर्थी निमित्त एक सामाजिक बांधिलकीचे नात्यातून बोरघर येथील तरुणांनी सदरचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. त्यावेळी उपस्थित तरुण वर्ग गावकरी यांचा विशेष पाठिंब्याने श्री गणपती बाप्पांच्या पूजा – अर्चना आदी धार्मिक विधी अतिश भगत ते श्रींच्या आरतीचे मान प्रशांत भगत यांना देण्यात आला. काळभैरव क्रिडा मंडल बोरघर यांचा साखर चौथ गणेश चतुर्थी निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या रक्त दान शिबिर तसेच आरोग्य विषयक तपासणी व उपचार करण्यात आले.

तसेच उपस्थित गणेश भक्तांना मंडळाचे सदस्य सुरेंद्र कडव यांजकडून मास्क वाटप व संपूर्ण गावासाठी सागर भगत यांनी paracetamol acticin 650 mg गोळ्या वाटप करण्यात येऊन अनोख्या स्तुत्य उपक्रमाप्रसंगी काळभैरव क्रिडा मंडल बोरघर यांचा साखर चौथ गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारणी कमिटी पदाधिकारी सागर भगत,प्रशांत भगत, अतिश भगत, संदेश भगत,अक्षय भगत,अनिकेत भगत,मनोज सुटे, परशुराम माने, विराज भगत, संचित सुटे, सन्मेश सुटे, मोहन सुटे, राजेंद्र भगत, ओंकार भगत, शुभम भगत, प्रणीत माने, दिलीप भगत, दिवेश भगत, रोहित भगत आदी गावातील तरुण सदस्य वर्ग आणि ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.