उरणमध्ये बोट मालकाने खलाशांना सोडले वाऱ्यावर, पोलिसांनी दिले कारवाईचे संकेत

उरण: मच्छीमार बोटीवर खलाशांचे काम करणाऱ्या परप्रांतियांना करंजा येथे गणेशनाखवांनी वाऱ्यावर सोडल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट आले आहे. त्यांनी याची तक्रार उरण पोलीस ठाण्यात केली आहे. वरिष्ठ

उरण: मच्छीमार बोटीवर खलाशांचे काम करणाऱ्या परप्रांतियांना करंजा येथे गणेश नाखवांनी वाऱ्यावर सोडल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट आले आहे. त्यांनी याची तक्रार उरण पोलीस ठाण्यात केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी चौकशी करून कारवाईचे संकेत दिले आहेत. जागृत पत्रकारांमुळे स्वार्थी नाखवाचा पर्दाफाश झाला.

 कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन असल्याने सर्व उद्योगधंदे बंद आहेत. मच्छीमार बोटीही बंद आहेत. त्यामुळे खलाशांना पोसणे मालकांना कठीण बनले आहे. अशाच कल्याण येथील एका मच्छीमार नाखवाने आपल्या बोटीवरील १२ खलाशांना ५० दिवसानंतर करंजा बंदरात उतरवून त्यांना हाकलून देत माणुसकीला काळिमा फासण्याचे काम केले आहे.   हे खलाशी हे उत्तर प्रदेश येथील सुल्तानपुरातील येथील रहाणारे आहेत. गेले अनेक दिवस त्यांनी तांदूळ उकडून तेच अन्न खाऊन दिवस ढकलले आहेत. त्यांना मालकांनी हाकलून दिल्यानंतर ते करंजा येथून पायी चालत आले. त्यांना उरण येथे पत्रकार विरेश मोडखरकर,घन:श्याम कडू, आशिष घरत व प्रदीप पाटील यांनी विचारपूस केली असता नाखवाचे बिंग फुटत खलाशांनी आपल्यावरील अन्यायाचा पाढाच पत्रकारासमोर वाचला. यानंतर पत्रकारांनी ही घटना वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांच्या कानावर घालताच त्यांनी त्वरित मदत करण्याचे आश्वासन देत, काहींना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले.  या खलाशांनी आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगताच रॉयल हॉटेलचे मालक सतीश गुप्ता यांनी त्यांना त्वरित हॉटेलमधून नाष्टा उपलब्ध करून दिला. जोपर्यंत फायदा होता तोपर्यंत या खलाशांचा वापर केला. फायदा बंद होताच या खलाशांना वाऱ्यावर सोडण्याचे काम केल्याने बोट मालकाची उरणमध्ये नाचक्की होत आहे. तरी अशा फायद्यापुरता वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी पत्रकारांनी केली आहे.